फलटण (प्रतिनिधी) :फलटण शहरातील रविवार पेठ, पोतेकर बोळ येथे गणेश मंदिराचे भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. हा सोहळा गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी (विजयादशमी-दसरा) सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या भूमिपूजनाचा शुभारंभ महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार तसेच माजी सभापती मा.ना. श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या सोहळ्यास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रविवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष श्री. नीतीन मारूतराव चोरमले (सावकार) यांनी केले आहे.


























