Homeताज्या बातम्यासदाशिव खरात यांचे लोकहितवादी कार्य आदर्शवत – चंद्रकांत मोहिते

सदाशिव खरात यांचे लोकहितवादी कार्य आदर्शवत – चंद्रकांत मोहिते

फलटण – फलटण पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी, मालोजी नगर कोळकी (ता. फलटण) येथील किशोरसिंह गृह निर्माण सोसायटीचे चेअरमन आणि फलटण तालुका सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष सदाशिव यशवंत खरात (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अस्थि-संकलन व पुण्यानुमोदन कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेच्या फलटण तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव, समता सैनिक दलाचे प्रतिनिधी, बौद्धाचार्य यांच्यासह चंद्रकांत मोहिते बोलत होते.

मोठ्या आदराने त्यांनी सांगितले की, “स. य. खरात यांनी आयुष्यभर समाजासाठी कार्य करताना अनेक सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक उपक्रम उभे केले. पंचायतराज संस्थेतून त्यांनी शेकडो गरजू कुटुंबांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून दिले. बुद्ध–फुले–शाहू–आंबेडकर सभागृह, कोळकी (फलटण) यांच्या उभारणीतही त्यांचा मोलाचा सहभाग होता. समाजकार्यासाठी त्यांची निष्ठा आणि तळमळ ही पुढील पिढ्यांसाठी आदर्शवत आहे.”

मूळ गाव कलेढोण (ता. खटाव) असलेल्या खरात साहेबांचे स्थायिक वास्तव्य कोळकी येथे होते. सातारा, दहिवडी येथे सेवा बजावल्यानंतर ते फलटण पंचायत समितीत जवळपास पंचवीस वर्षे कार्यरत राहिले. निवृत्तीनंतरही त्यांनी संपूर्ण वेळ सेवानिवृत्त संघटनेच्या सेवा-कार्यास दिला. सेवानिवृत्तांचे प्रश्न, हक्क, मागण्या मांडणे व सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असत. त्यांच्या व्यापक जनसंपर्कामुळे अनेकांना मार्गदर्शनाचा आधार मिळत असे.

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्याने त्यांच्यावर फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे दीड वाजता त्यांनी शांतपणे देह ठेवला.

त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, नातू व मुली असा परिवार आहे.

अस्थि-संकलन, पूजन व पुण्यानुमोदन कार्यक्रम कोळकी येथील निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी भिकू भोसले, जयवंत काकडे, अॅड. मनोज जावळे, समाजसेविका कांताताई काकडे, जस्ट प्रवचनकार स्वामीना, जस्ट प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे, तसेच कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी स. य. खरात यांच्या धम्मनिष्ठ कार्याला, सामाजिक बांधिलकीला आणि जनसेवी जीवनाला भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

त्यांच्या समर्पित सेवेला धम्मपर आदरांजली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात केवळ १.२८ लाख, ३.१२ कोटी नाही, भू सर्वेक्षण प्रकरणे प्रलंबित, बावनकुळे म्हणतात

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुणे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले की, महाराष्ट्रात १.२८ लाख भू सर्वेक्षण प्रकरणे...

सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाची खंडणी केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक

पुणे : आळंदी-पुणे रोडवरील दिघी येथे सापळा रचून खासगी सुरक्षा एजन्सीच्या मालकाकडून तीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने मंगळवारी एका...

साक्षीदार नाही, पण सुगावाचा माग: केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांनी एकत्र नांगी; पॉलीग्राफ चाचणी,...

रिया गोयल (आर) आणि तिचा कथित प्रियकर, चेतन चौधरी (एल), रिअल्टर केतन अग्रवाल (एम) च्या कथित हत्येप्रकरणी पॉलीग्राफ आणि चाल विश्लेषण चाचण्यांना सामोरे...

ऑनलाइन शेअर फसवणुकीत कात्रज दुकानदाराचे ६४ लाखांचे नुकसान

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगद्वारे जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी कात्रज येथील एका ५३ वर्षीय दुकानदाराची ६३.८५ लाख रुपयांची...

*शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!*

शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!   दूरदृष्टी, संशोधन आणि शेतकरीहितासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय कार्य भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा...

error: Content is protected !!