Homeताज्या बातम्यासांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर...

सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

फलटण, प्रतिनिधी : सांगवी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ फलटण तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, फलटण तालुक्याला अनेक दशकांपासून हिंदू-मुस्लिम ऐक्याची आणि सामाजिक सलोख्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. या परंपरेमुळे तालुक्यातील विविध समाजघटकांमध्ये परस्पर विश्वास, बंधुभाव आणि सामंजस्याचे वातावरण कायम राहिले आहे. मात्र, सांगवी येथे घडलेल्या घटनेमुळे सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर; ऐक्य टिकविण्यासाठी मुस्लिम समाज कटिबद्ध

या घटनेमुळे हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, त्यांच्या भावनांचा मुस्लिम समाज पूर्णपणे आदर करतो. सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी मुस्लिम समाज हिंदू बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. फलटण तालुक्यातील हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा अबाधित राहावी आणि समाजामध्ये शांतता व सलोखा कायम राहावा, यासाठी मुस्लिम समाज कटिबद्ध असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी

सांगवीतील घटनेची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित दोषी व्यक्तींची चौकशी करावी आणि दोष सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तालुक्यात शांतता, सामाजिक सलोखा आणि परस्पर विश्वासाचे वातावरण कायम राहण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशी अपेक्षाही फलटण तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास...

0
जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास मनाई; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण २४ ते...

मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान

0
मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क मुधोजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. ललित...

दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री केल्यास कारवाईचा इशारा! फलटण तहसील कार्यालयाचा इशारा; सुरक्षित आणि...

0
📰 दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री केल्यास कारवाईचा इशारा! फलटण तहसील कार्यालयाचा इशारा; सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज...

बांधकाम कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू! २१ ऑक्टोबर २०२६...

0
मुंबई : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी या...

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवताना आता शिक्षकांच्या हजेरीचीही ऑनलाइन नोंद घेतली जाणार आहे. राज्यातील...

0
स्विफ्टचॅटवरील स्मार्ट उपस्थिती पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी अनिवार्य, चॅटबॉटचा वापर समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवताना आता शिक्षकांच्या हजेरीचीही ऑनलाइन नोंद...

error: Content is protected !!