Homeताज्या बातम्यासाताऱ्यात शिवसेना महिला आघाडीचे माझं कुंकू, माझा देश आंदोलन

साताऱ्यात शिवसेना महिला आघाडीचे माझं कुंकू, माझा देश आंदोलन

सातारा –दि.१४| शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीतर्फे साताऱ्यात माझं कुंकू, माझा देश आंदोलन छेडण्यात आले. केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामने खेळण्यास दिलेल्या परवानगीचा निषेध नोंदवण्यासाठी शिवतीर्थ, पोवई नाका येथे हे आंदोलन झाले.या वेळी शिवसेना उपनेत्या छाया शिंदे यांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचा हिरवी साडी-चोळी, बांगड्या व लाल कुंकू देऊन जाहीर निषेध व्यक्त केला.शिंदे म्हणाल्या की, “भारत-पाकिस्तान अबुधाबीमध्ये आज होणारी मॅच केंद्र सरकारने जाहीरच करू नये होती. शिवसेनेने या सामन्याला सुरुवातीपासूनच विरोध केला होता. तरीदेखील हा सामना आयोजित करून पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 26 जवानांच्या कुटुंबीयांचा घोर अपमान केला आहे. हे देश कधीच विसरणार नाही.”

शिंदे पुढे म्हणाल्या की, “एखाद्या देशाविरुद्ध आपण बहिष्कार टाकला तर त्या देशाविरुद्ध कोणताही द्विपक्षीय सामना किंवा आंतरराष्ट्रीय मालिका होऊ नये. मात्र पैशासाठी आणि फायद्यासाठी हा सामना घेण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आम्ही केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्ष जय शहा यांच्यावर करतो.”

या आंदोलनात पाकिस्तानविरोधात तसेच केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करताना म्हटले की, “पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या 26 जवानांच्या कुटुंबियांचा विचार करता पाकिस्तानविरुद्ध खेळली जाणारी मॅच आपण पाहू नये. त्यावर बहिष्कार घातलाच पाहिजे. हाच त्या शहीदांना खरी श्रद्धांजली ठरेल.”

या आंदोलनात अमृता पाटील (जिल्हा संघटिका सातारा-जावळी), साधना साळुंखे, शांता गुळगे, तसेच शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. याशिवाय युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर धोत्रे, तालुका प्रमुख रमेश बोराटे, तालुका प्रमुख सुनील पवार, उपशहर प्रमुख गणेश अहिवळे, उपशहर प्रमुख आकाश धोंडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

फॅक्टरी फ्लोअर्सपासून फ्रंटलाइन्सपर्यंत, ह्युमनॉइड रोबोट्स ग्राउंड मिळवतात

1920 मध्ये, "रोबोट" या शब्दाची झेक नाटकात पदार्पण झाली; 106 वर्षांनंतर रोबोटने युद्धभूमीवर पदार्पण केले.या जानेवारीत, रशियन सैनिक मानवरहित, सशस्त्र युक्रेनियन रोबोटला आत्मसमर्पण करतानाचे...

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत 90 किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते

चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

error: Content is protected !!