खटाव | प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील सामाजिक चळवळीतील परिचित व सर्वसामान्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे माजी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे सातारा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तसेच एस. एस. न्यूजचे पत्रकार अर्जुनराव भालेराव यांचा वाढदिवस आज खटाव तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अर्जुनराव भालेराव हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असून, गावागावातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. रेशन कार्डचा प्रश्न असो, शासकीय दाखल्यांचा विषय असो किंवा कोणत्याही व्यक्तीवर अन्याय-अत्याचार झाला असल्यास त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. आंदोलन, उपोषण यांसारख्या मार्गाने त्यांनी अनेक वेळा सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे.
त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे ते सर्वसामान्यांच्या मनातील एक विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त खटाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व आजी-माजी संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अर्जुनराव भालेराव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, दीर्घायुष्य लाभावे व सामाजिक कार्य अधिक जोमाने सुरू राहावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.


























