
“आताचा प्रवास हा आज्ञानाकडून ज्ञानाकडे, ज्ञानाकडून विज्ञानाकडे आणि विज्ञानाकडून तंत्रज्ञानाकडे झाला आहे. आजचे जग हे संपूर्णपणे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगत दिशेने वेगाने धावत आहे,” असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, साताराचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के यांनी केले.
फलटण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक करत विज्ञानाची प्रयोगशीलता, संशोधन वृत्ती आणि कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
गटनिहाय निकाल माध्यमिक गट
प्रथम: सर्वेश शिंदे (मालोजीराजे शेती महाविद्यालय, फलटण)
द्वितीय: ऋतुगंधा रणवरे (खुटे हायस्कूल, खुटे हिरकणी)
तृतीय: विनायक खोमणे (पाचपांडव मा. आश्रम शाळा, अलगुडेवाडी)
उत्तेजनार्थ: कृणाल जाधव (मुधोजी हायस्कूल, फलटण)
प्राथमिक गट
प्रथम: सोहम भोईटे, ओम धुमाळ (न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, आदर्की बु.)
द्वितीय: चैतन्य गुंजवटे, अधिराज वांभुरे, सार्थक सोनवलकर, ओम धुमाळ (प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, कोळकी)
तृतीय: आयुष जाधव, वरुण चव्हाण, प्रणव खराडे (प्राथमिक शाळा, काळज)
उत्तेजनार्थ: सई गायकवाड, ईश्वरी कंक (जिल्हा परिषद शाळा, तरडगाव)
🔹 शिक्षक गट
माध्यमिक विभाग – प्रथम: धनंजय दिनकर सस्ते (यशवंतराव चव्हाण हायस्कूल, फलटण)
प्राथमिक विभाग – प्रथम: आशा यादव (साखरवाडी विद्यालय)
उत्तेजनार्थ: शैला पिसाळ (विनर्स गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, नाईकबोमवाडी)
🔹 प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर
प्रथम: जयंत हनुमंत काळुखे (साखरवाडी विद्यालय)
🔹 दिव्यांग विद्यार्थी
प्रेम पवार,अनिकेत बापूराव, चैतन्य पवार (मूकबधिर विद्यालय, ठाकूरकी)
🔹 वक्तृत्व स्पर्धा
माध्यमिक गट
प्रथम: दैवत मारकड (न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, सुरवडी)
द्वितीय: मेहरोज इंतेकाफ शेख (प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, कोळकी)
तृतीय: दूर्वा कदम (साखरवाडी विद्यालय)
प्राथमिक गट
प्रथम: श्रीनी तंगारे (यशवंतराव चव्हाण विद्यालय, फलटण)
द्वितीय: वैभवी भोसले (साखरवाडी विद्यालय)
तृतीय: सान्वी गावडे (प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, कोळकी)
उत्तेजनार्थ: संस्कृती दहस (न्यू इंग्लिश स्कूल, पाडेगाव)
प्रश्नमंजूषा स्पर्धा
माध्यमिक
प्रथम: वैष्णवी तावरे, श्रेया यादव, खुषी दोशी (कमला निमकर बालभवन, फलटण)
द्वितीय: विनंती जगदाळे, ज्ञानेश्वरी डोंबाळे, आर्यन बांदल (प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, कोळकी)
तृतीय: श्रुती सरगर, दिशा काळे, अमृता ढोपरे (श्रीमानशेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय, धुळदेव)
प्राथमिक
प्रथम: आदिती पन्हाळे, वैभवी घोरपडे, निग्राह कच्छी (बीजे इंग्लिश मीडियम स्कूल, साखरवाडी)
द्वितीय: समर्थ खटके, अधर्व खटके, अनुराज बलकुळे (प्राथमिक शाळा, खटकेवस्ती)
तृतीय: प्रगती दडस, वैष्णवी जगदाळे, भास्कर अनासाने (श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर, फलटण)
यावेळी प्रमुख उपस्थिती कृष्णदेव क्षीरसागर (प्राचार्य, भारत चिल्ड्रन्स ॲकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज, वालचंदनगर),माजी प्राचार्य रवींद्र येवले,अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी,ग्रामीण कथाकार न. रवींद्र कोकरे,रणजित निंबाळकर (GC सदस्य),मोहनराव डांगे,उपसरपंच अशोक नाळे (कोळकी),गटशिक्षणाधिकारी सी.जी. मठपती,तालुका समन्वयक दमयंती कुंभार,संध्या गायकवाड (व्यवस्थापकीय संचालिका),प्राचार्य सुजाता गायकवाड तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.


























