Homeताज्या बातम्या*उपविभागीय पोलीस अधिकारी* *फलटण विभागाकरिता अत्याधुनिक सर्व्हिलन्स व्हॅन दाखल**

*उपविभागीय पोलीस अधिकारी* *फलटण विभागाकरिता अत्याधुनिक सर्व्हिलन्स व्हॅन दाखल**

उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभागाकरिता अत्याधुनिक सर्व्हिलन्स व्हॅन दाखल

फलटण : शहर आणि तालुक्यात वाढती लोकसंख्या, वाहतूक आणि विविध कार्यक्रमांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान दिवसेंदिवस वाढत असताना पोलिसांच्या बंदोबस्त दलाची क्षमता वाढवण्यासाठी फलटण उपविभागाला अत्याधुनिक सर्व्हिलन्स व्हॅन मिळाली आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मान्यतेने ही व्हॅन फलटण शहर पोलीस ठाण्याच्या ताफ्यात दाखल झाली आहे.

सदर व्हॅनच्या चारही बाजूंना बसविण्यात आलेले उच्च-प्रतिचे सीसीटीव्ही कॅमेरे, सर्च लाईट, तसेच आतमध्ये बसविण्यात आलेली मोठी स्क्रीन यामुळे गर्दी, वाहतूक आणि संपूर्ण परिसराचे 360° निरीक्षण करणे शक्य होणार आहे. बंदोबस्तातील तातडीच्या परिस्थितीत मदत व्हावी म्हणून व्हॅनमध्ये प्राथमिक उपचार पेटी, स्ट्रेचर, पिण्याचे पाणी, फायर एक्स्टिंग्विशर यांसारख्या सुरक्षाविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासोबत P.A. सिस्टीम बसविण्यात आली असून मोठ्या गर्दीत, उत्सवांमध्ये किंवा वाहतूक विस्कळीत झाल्यास नागरिकांना तातडीच्या सूचना देणे अधिक सुलभ होणार आहे.

महत्त्वाच्या बंदोबस्तावेळी, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याच्या परिस्थितीत, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये ही व्हॅन अत्यंत प्रभावी ठरणार असून पोलिसांचा प्रतिसाद अधिक सक्षम आणि वेगवान होईल अशी अपेक्षा आहे. आज दि. २५ मार्च २०२६ रोजी मोटार परिवहन विभाग, सातारा येथील अधिकारी आणि अंमलदारांनी या व्हॅनचे तांत्रिक प्रशिक्षण फलटण विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना दिले.

या अत्याधुनिक सर्व्हिलन्स व्हॅनची फलटण उपविभागाला मिळाल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, तसेच विशाल खांचे, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद...

अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांचे आवाहन. समर्थ...

*सुरवडीजवळ मेंढपाळ कुटुंबास मारहाण, शिवीगाळ आणि कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल*

सुरवडीजवळ मेंढपाळ कुटुंबास मारहाण, शिवीगाळ आणि कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : फलटण तालुक्यातील सुरवडी गावालगत घडलेल्या एका धक्कादायक...

*अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी*

अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण   फलटण .दि. ६ जुलै : भारतीय हवामान विभागाने (IMD) सातारा...

पावसाळ्याचा कहर: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, भूस्खलनानंतर जुना महामार्ग बंद, मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत |...

सार्वजनिक सल्लागारात, अधिकृत हँडलवरील महामंडळाने सांगितले की, द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावरील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत स्थगित राहील. पुणे: घाट विभागात दरड कोसळल्याने...

शहरात पावसाची संततधार, घाट भागात जोरदार पाऊस

रविवारी झालेल्या पावसामुळे पुण्यातील कर्वे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती पुणे : शनिवार ते रविवार सकाळी 8.30 या 24 तासांत पुणे...

error: Content is protected !!