Homeताज्या बातम्याकर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडीची शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ठरली अभ्यासपूर्ण व संस्मरणीय

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडीची शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ठरली अभ्यासपूर्ण व संस्मरणीय

(बिजवडी) : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी (ता. माण, जि. सातारा) येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2025–26 अंतर्गत आयोजित करण्यात आलेली दोन दिवसांची शैक्षणिक सहल अत्यंत यशस्वी व ज्ञानवर्धक ठरली. गुरुवार दि. 11 डिसेंबर 2025 व शुक्रवार दि. 12 डिसेंबर 2025 या कालावधीत ही सहल पार पडली.

सहलीची सुरुवात गुरुवारी पहाटे बिजवडी येथून झाली. विद्यार्थ्यांची उपस्थिती घेतल्यानंतर गाडी पूजन करून प्रवासाला प्रारंभ करण्यात आला.

प्रवासादरम्यान वाई येथील गणपती दर्शन, महाबळेश्वर दर्शन तसेच प्रतापगड किल्ल्याला भेट देण्यात आली. प्रतापगडावरील ऐतिहासिक महत्व, शिवकालीन इतिहास व गडांची भौगोलिक रचना याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यानंतर महाड येथे चवदार तळ्याला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक सत्याग्रहाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सामाजिक समता, मानवाधिकार व संविधान मूल्यांवर चर्चा करण्यात आली. पुढे हरिहरेश्वर दर्शन, दिवेआगर येथे मुक्काम व समुद्रकिनाऱ्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.

शुक्रवारी सकाळी दिवेआगर बीच येथे समुद्रकिनाऱ्याच्या पर्यावरणीय वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात आला. समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधता, स्वच्छता, प्रदूषण व पर्यावरण संवर्धन यावर प्रत्यक्ष निरीक्षण व चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुरुड-जंजिरा किल्ला, पाली येथील गणपती दर्शन, महड गणपती दर्शन तसेच पुणे येथे कृषी प्रदर्शनाला भेट देण्यात आली. आधुनिक शेती, तंत्रज्ञान व कृषी विकासाबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

या संपूर्ण सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक व सांस्कृतिक बाबी प्रत्यक्ष पाहून अनुभव घेतला. पर्यावरण संवर्धन, जलप्रणाली, लोकजीवन, प्रदूषण नियंत्रण यांसारख्या विषयांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी आनंदही मनमुराद लुटला.

या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तकातील ज्ञान अधिक व्यापक झाले असून प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी त्यांना मिळाली.शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र शिर्के,सहशिक्षक बाबासाहेब जगताप व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहलीचे यशस्वी नियोजन व मार्गदर्शन व नियोजन केले. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे पालक प्रतिनिधी, स्कुल कमिटी, पालक या सर्वांनी सहलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले.सहल प्रमुख श्री. वाघ सर, श्री जगताप सर, निंबाळकर सर, अवघडे सर तसेच सर्व शिक्षक व महिला शिक्षिका यांनी उत्कृष्ट सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटण पालिकेतील कर घोटाळा उघड! ऑनलाईन करप्रणालीत** *फेरफार करून* *लाखोंचा अपहार*; *नगराध्यक्ष...

फलटण पालिकेतील कर घोटाळा उघड! ऑनलाईन करप्रणालीत फेरफार करून लाखोंचा अपहार;   नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा मोठा खुलासा   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण     महानेट सॉफ्टवेअरमधील कथित छेडछाड,...

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

error: Content is protected !!