Homeताज्या बातम्याकोळकी विहार येथे वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

कोळकी विहार येथे वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

संघटन विस्तार, निवडणूक आढावा, संविधान संरक्षणाचा निर्धार व आगामी निवडणुकीची तयारी

फलटण : दिनांक 22 डिसेंबर 2025 (सोमवार) रोजी सकाळी 11.00 वाजता बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर सामाजिक सभागृह कोळकी, फलटण येथे

वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्व यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका यांच्या वतीने तालुकाध्यक्ष महावीर भालेराव व कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष रामदास कांबळे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सातारा जिल्हा पूर्व व फलटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान सामाजिक न्याय, समता व संविधानिक मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक ठरला. या बैठकीत गावोगावी वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उभारणे, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमधील कामगिरीचा सविस्तर आढावा, तसेच आगामी महानगर पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत रणनीती यावर सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी येणाऱ्या काळात श्रद्धेय ॲड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व ताकदीनिशी निवडणुका लढवून राजकीय सत्ता हस्तगत करणे, संविधानाचे संरक्षण करणे आणि सर्वसमावेशक विकासाचे स्वप्न साकार करणे याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. वाड्या-वस्त्या व गावागावांत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. या बैठकीस रामदासजी कांबळे (अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्व), सुभाष गायकवाड (जिल्हा उपाध्यक्ष), सचिव अरविंद आढाव, शाहू, फुले, आंबेडकर विद्वद्या विचारधारा चे अशोक भोसले, विजय लोंढे (उपाध्यक्ष), भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा पूर्व चे सचिव सुनिल कदम,ॲड. तेजस मोरे (सचिव), निकाळजे सर, कांबळे सर, संदीपभाऊ काकडे (फलटण तालुका अध्यक्ष), अजित कांबळे, सुमित मोरे, उमेश कांबळे (फलटण शहर अध्यक्ष), युवराज भोसले (माण तालुका अध्यक्ष), चित्राताई गायकवाड (महिला जिल्हा उपाध्यक्ष), कांता काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठक “जय भीम, जय संविधान” या घोषणांनी उत्साहात संपन्न झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

error: Content is protected !!