Homeताज्या बातम्या*क्रांतीबा ज्योतिबा फुले हे भारतीय समाज सुधारणयाचे अग्रदूत.प्रा.डॉ.प्रभाकर पवार*

*क्रांतीबा ज्योतिबा फुले हे भारतीय समाज सुधारणयाचे अग्रदूत.प्रा.डॉ.प्रभाकर पवार*

क्रांतीबा ज्योतिबा फुले हे भारतीय समाज सुधारण्याचे अग्रदूत -प्रा.डॉ. प्रभाकर पवार

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण

पेशवाईच्या अस्ताानंतर १९ व्या शतकात आधुनिक विचार व समाज सुधारण्याचे वारे भारतात वाहू लागले.हा प्रबोधनाचा पूर्व रंग होता.या काळात सर्वप्रथम शिक्षण ज्ञान आणि स्त्री-पुरुष समानतेचा नारा देऊन क्रांतीबा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक सुधारणा व आधुनिक जीवन प्रणालीची हाक देऊन,अंधश्रद्धा व दांभिक वृत्तीला कडवे आव्हान दिले मुलींची शाळा काढून शूद्राति- शूद्र बहुजन समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा कृतीकार्यक्रम त्यांनी आखला. त्यामुळे क्रांतीबा फुले हेच भारतीय समाज सुधारण्याचे अग्रदूत ठरतात,असे प्रतिपादन प्रा.डॉ.प्रभाकर पवार यांनी केले. मुधोजी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विशेष सप्ताहात,प्रबोधन कार्यक्रमात प्रा.डॉ.प्रभाकर पवार हे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.सौ. सरिता माने होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. नवनाथ रासकर,प्रा.डॉ.अनिल टिके, प्रा.डॉ.अशोक शिंदे,प्रा. डॉ. टी.पी शिंदे इत्यादी उपस्थित होते.

” भारतीय समाज क्रांतीचे अग्रदूत :क्रांतिबा फुले”,या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत असतानाप्रा.डॉ.प्रभाकर पवार पुढे म्हणाले,क्रांतीबा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या मानवी अधिकार”,या ग्रंथाचा प्रभाव होता.स्वातंत्र्य,समता, बंधुता व सामाजिक न्यायाची त्यांना जाणीव झाल्यानंतर शिक्षण प्रसार व समाज सुधारणा यावर त्यांनी भर दिला. त्यांनी मुला-मुलींच्या शाळा चालवल्या,जीर्ण प्रथांच्या विरोधात आंदोलने केली व मोठ्या प्रमाणात समाज परिवर्तनवादी लेखनही केले. त्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर पडू लागला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी सार्वजनिक सत्य धर्माचा आग्रह धरला. सत्यशोधक विचारांचा प्रभाव इतका मोठा होता की त्यातून हजारो कार्यकर्ते तयार झाले राजर्षी शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,विठ्ठल रामजी शिंदे,कर्मवीर भाऊराव पाटील,संत गाडगेबाबा,श्रीमंत मालोजीराजे यांनी हा विचार समाजभर विविध उपक्रमाद्वारे पसरविला.शिक्षण,ज्ञान, समाज सुधारण्याला व शेतकरी हिताला त्यामुळे बळ मिळाले.हे मानवतावादी कार्य झाल्यामुळेच आधुनिक विचारसरणी, धर्मनिरपेक्षता व विज्ञान वादाला गती मिळाली . क्रांतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या या क्रांतिकारक प्रकाश कार्याचा वसा घेऊन आजच्या समाजाने भारतीय समाजव्यवस्थेला मजबूत करून विकास साधला पाहिजे. इंग्रज लोकांकडून भारतीयांनी आधुनिकता व धाडशी वृत्ती स्वीकारली पाहिजे, त्यासाठी विज्ञान आणि शिक्षणाचा ध्यास घेऊन आयुष्य सुधारणावादी केले पाहिजे,असा क्रांतीबा फुले यांचा निग्रहाचा आग्रह होता.असेही प्रा.डॉ. प्रभाकर पवार यांनी आवर्जून सांगितले.

अध्यक्षपदावरून बोलतानाप्रा. डॉ. सौ.सरिता माने म्हणाल्या,भारताला समाज सुधारणेची नितांत आवश्यकता होती.अशावेळी क्रांतीबा फुले यांना शिक्षण आणि ज्ञानाचे महत्त्व पटले. स्त्रियांना ज्ञान व त्यांचा विकास हा झाला पाहिजे,या हेतूने त्यांनी भारतीय समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा,कर्जबाजारीपणा,भोंदूगिरी,बुवाबाजी यांना आळा घालताना सत्यशोधक समाजा द्वारे खूप प्रयत्न केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक -प्राध्यापिका, शिक्षकेतत्तेर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.नवनाथ रासकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शेवटी आभार प्रा.अंकुश खोब्रागडे यांनी करून कार्यक्रमाचा समारोप केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले : रोहित पवार

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याने बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोके वर काढत असल्याचा दावा...

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

error: Content is protected !!