Homeताज्या बातम्या*फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशला हाऊसफुल्ल प्रतिसाद. स्वायत्त दर्जेमुळे महाविद्यालयाच्या...

*फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशला हाऊसफुल्ल प्रतिसाद. स्वायत्त दर्जेमुळे महाविद्यालयाच्या मानाचा तुरा*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
दि १० मे २०२६

ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया अत्यंत उत्साहात सुरु झाली आहे. महाविद्यालयाने नुकताच प्राप्त केलेला यूजीसी ऑटोनॉमस (स्वायत्त) दर्जा, नॅक ए ग्रेड आणि एनबीए मानांकन यामुळे संस्था आणि महाविद्यालयाची विश्वासार्हता वाढली असून, डिग्री व डिप्लोमाच्या विविध अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग यांसारख्या आधुनिक शाखांसह कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या कोर्सेससाठी प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा मोठा कल दिसून येत आहे.

केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी हे महाविद्यालय नेहमीच अग्रभागी राहिले आहे. याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ‘इन्नोव्हेशन २०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून तब्बल ७०४ संघांनी सहभाग नोंदवून आपल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले होते. या अभूतपूर्व प्रतिसादाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे. तांत्रिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘टेक बीट्स’ सारख्या सांस्कृतिक महोत्सवातून डान्स आणि फॅशन शो सारखे उपक्रम राबवून विद्याथ्य व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जात आहे.

महाविद्यालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील जागतिक स्तरावरील संधींचे व्यासपीठ, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘करिअर एक्स्पो’मध्ये १७ देशांतील विद्यापीठांचे प्रतिनिधी, विविध बँका आणि नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक सहाय्य आणि नोकरीच्या संधींची दारे खुली झाली आहेत. महाविद्यालयाने राबविलेल्या प्रभावी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह मुळे अनेक विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये निवड झाली असून, अनेक माजी विद्यार्थी आज नामांकित उद्योजक आणि शासकीय उच्च पदांवर कार्यरत आहेत.

महाविद्यालयाची ही उत्तरोत्तर होणारी प्रगती पाहुन फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सोसायटी नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाविद्यालय समितीचे चेअरमन अॅड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर

यांनी समाधान व्यक्त केले आहे.

महाविद्यालयात उपलब्ध असलेला उच्च विद्या विभूषित व अनुभवी प्राध्यापक वर्ग आणि अद्ययावत सोयी सुविधांचा लाभ घेत परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन आपले करिअर घडवावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांनी केले आहे. या यशामुळे हे महाविद्यालय संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तंत्रशिक्षणाचे एक प्रमुख केंद्र म्हणून नावारुपास आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले : रोहित पवार

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याने बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोके वर काढत असल्याचा दावा...

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

error: Content is protected !!