Homeताज्या बातम्याजिल्ह्यातील 320 मेगावॅटच्या मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेला गती द्यावी टास्क फोर्सच्या...

जिल्ह्यातील 320 मेगावॅटच्या मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेला गती द्यावी टास्क फोर्सच्या बैठकीत महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश

कोल्हापूर, दि. ०७ : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० मधून शेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 77 ठिकाणी एकूण 320 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून याद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा होणार आहे. सध्या ११ ठिकाणांवरील एकूण ३९ मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून यातून १४,९४२ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. या योजनेच्या कामांना आणखी गती द्यावी असे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवारी (दि. ०७) दिले.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक झाली. यावेळी लोकेश चंद्र बोलत होते. कार्यकारी संचालक परेश भागवत( देयक व महसूल), सल्लागार श्रीकांत जलतारे, प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट, महापारेषणचे शिदाप्पा कोळी, विद्युत निरीक्षक शकील सुतार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले की, मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेली मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे पुढील एक वर्षात १६ हजार मेगावॅट विजेचा शेतीला दिवसा पुरवठा करण्यात येणार आहे. एजन्सीने सर्व कामाचे अपडेट पोर्टलवर करणे बंधनकारक असून या कामाची पडताळणी नोडल अधिकारी म्हणून उप विभागीय अधिकारी यांनी करावी.

या योजनेचे शेतकऱ्यांना महत्त्व पटवून द्यावे. गैरसमजातून होणारे विरोध प्रबोधनाद्वारे दूर करावे. लोकसंवाद व सहकार्यातून या योजनेला गती देण्यासाठी टास्क फोर्सने पुढाकार घ्यावा. तसेच सौर प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय व खाजगी जमीन उपलब्ध करून घेणे, भूसंपादन करणे व सौर प्रकल्पांसाठी आवश्यक पायाभूत सेवेत सुधारणा करण्याचे कामांना गती देण्यात यावी असे निर्देश श्री. लोकेश चंद्र यांनी दिले.

महावितरणचे प्रत्येक कार्यालयात रूप टॉप सोलर सोलर बसवण्याचे काम लवकर पूर्ण होणार आहे. येत्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभांत महावितरणच्या विविध योजनांची माहिती द्यावी, लोकप्रतिनिधी व स्थायिक स्वराज्य संस्था यांनाही या योजनांत सामील करून घ्यावे, कोल्हापूर व इचलकरंजी येथे होणाऱ्या ई बसच्या अनुषन्गाने महावितरणची कामे तात्काळ पूर्ण करून द्यावीत असे आदेश लोकेश चंद्र यांनी यावेळी दिले.

औद्योगिक संघटनांशी साधला संवाद

यावेळी लोकेश चंद्र यांनी जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना सोबत संवाद साधला. औद्योगिक ग्राहकांसाठी स्वतंत्र स्वागत सेल पोर्टल करण्यात येत असून सर्व उद्योग संघटनांना त्यांचे स्वतंत्र आयडी पासवर्ड देण्यात येणार आहे. यामध्ये उद्योजक त्यांच्या समस्या व अपेक्षा मांडू शकतात . याचा आढावा मुख्यालय स्तरावरून नियमित घेतला जाणार आहे. उदयॊग व महावितरण एकत्र येऊन काम केले तर त्यांच्या समस्या लवकर सुटतील , याकरताच स्वागत सेल व पोर्टल केले आहे. राज्याचा उद्योग लोड दरवर्षी 6 टक्के वाढतो हे गृहीत धरून महावितरणने नियोजन केले आहे तसेच नवीकरणीय ऊर्जेचा राज्यातील सर्व ग्राहकांना फायदा मिळणार असे लोकेश चंद्र यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR | पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रियेला गती देण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात | पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...

error: Content is protected !!