Homeताज्या बातम्या*खामगाव हादरले! एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू*

*खामगाव हादरले! एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू*

खामगाव हादरले! एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

फलटण, दि. ८ : फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. घराबाहेरील विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबप्रमुखाला वाचविण्यासाठी धावलेल्या तिघांचाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. काही क्षणांतच एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खामगाव येथील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ राहणारे शिंदे कुटुंब बुधवारी पहाटे नेहमीप्रमाणे घराबाहेर आले होते. सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान घराबाहेरील विद्युत वायरमध्ये अचानक प्रवाह आल्याने पिसुरड्या किसन शिंदे (वय ४८) यांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचविण्यासाठी गंगुबाई पिसुरड्या शिंदे (वय ४६), सचिन पिसुरड्या शिंदे (वय २६) आणि आरती पिसुरड्या शिंदे (वय २२) यांनी धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने तेही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

घराबाहेरील विद्युत वायरमध्ये प्रवाह कसा आला, यामागे तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण, याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणा करीत आहेत. शिंदे कुटुंब एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्याने खामगावसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी घेतली भाजप नेते विनोद तावडे यांची भेट

जयंत पाटील (एल) आणि विनोद तावडे (नि.) यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएमध्ये सामील होण्याच्या अटकळांना तोंड फुटले. पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष...

*भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन...

फलटण : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप...

खंडाळा येथील भूस्खलनाच्या ढिगाऱ्यातून बचावकर्त्यांनी मृतदेह बाहेर काढला | पुणे बातम्या

पुणे : खंडाळा येथे भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी दुपारी बाहेर काढण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.पोलिस उपअधीक्षक गजानन...

138 पैकी 58 जलदगती न्यायालये सुरू झाली आहेत, बाकी न्यायाधीशांच्या प्रतीक्षेत: मुख्यमंत्री विधानसभेत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना सांगितले की, सरकारने 138 नवीन जलदगती न्यायालये सुरू करण्याच्या योजनेला...

एकाशी निगडीत, दुसऱ्याशी लग्न: सिया गोयलचे अंतिम ‘दुहेरी आयुष्य’ केतन अग्रवाल खून प्रकरणाचा तपास...

मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोप असलेली सिया गोयल ही कथितपणे दुहेरी जीवन जगत होती कारण पोलिस तपासात गुप्त विवाह केल्याचा दावा केला आहे....

error: Content is protected !!