Homeताज्या बातम्याडॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक...

डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ग. कौ. फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ग. कौ. फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या हस्ते करण्यात आला.

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतात कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले की, “‘No Document, No History’ हे खरे असले तरी, आपल्याला मिळालेला कागदपत्री पुरावा हा कोणी लिहिला आहे?का लिहिला आहे? तो कोणाचा हस्तक होता?त्याची विचारसरणी कोणती आहे? तो लोकाहितदक्ष होता की विध्वंसक होता?याची खात्री केली पाहिजे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतिहास नेमका खोटा लिहिला गेला आहे.आपण तो डोळसपणे तपासला पाहिजे. खोटेपणाला खोटेपणाने उत्तर न देता सत्य पुराव्यांच्या आधारे उत्तर दिले पाहिजे.” मानसिक गुलामी मध्ये व आंधळ्या श्रद्धेत खरेपणा नसतो, त्यासाठी खोट्या गोष्टींपुढे नतमस्तक न होता, खोट्याला खोटे व खऱ्याला खरे म्हणण्याचे सामर्थ्य पाहिजे.इतिहास लेखणात अनेक स्वार्थी प्रवृत्तीनी चुकीची, बदनामीकरक माहिती, धादांत खोटे पुरावे देऊन लेखन केलेले आहे ते पुसावे लागेल व सत्य इतिहास लिहावा लागेल, ही जबाबदारी पुढच्या पिढीने घेतली पाहिजे.

मुधोजी महाविद्यालयात सातारा इतिहास संशोधन मंडळाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात

फलटण, दि. १७ ऑक्टोबर : ज्येष्ठ विचारवंत, संशोधक आणि लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांना इतिहास संशोधन व लेखन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी आयोजित सातारा इतिहास संशोधन मंडळाच्या १७ व्या वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय परिषदेत फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि मुधोजी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय परिषदेचा मुख्य विषय ‘२० व्या शतकातील संस्थाने : फलटण संस्थानचा विशेष संदर्भ’ हा होता. इतिहास संशोधन, लेखन आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. आ. ह. साळुंखे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, संशोधक आणि लेखक म्हणून परिचित आहेत. प्राचीन भारतीय विचारपरंपरा, तत्त्वज्ञान, संस्कृती, सामाजिक समता आणि चिकित्सक विचार यांसंबंधीच्या त्यांच्या लेखनाने मराठी वैचारिक विश्वात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या संशोधनपर आणि प्रबोधनात्मक कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला.

परिषदेच्या उद्घाटन, मा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले, आपल्या उद्घाटन पर भाषणात ते म्हणाले, फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास पुरोगामी व लोकाभिमुख आहे.परंतु इतिहास लेखनाच्या अनेक ठिकाणी फलटण नाईक निंबाळकर घराण्याला चुकीच्या पद्धतीने इतिहासात मांडलेले आहे.मी याविरुद्ध अनेक गोष्टीत चॅलेंज करून नाईक निंबाळकरांच्या वरील खोटा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला आहे.पुढील इतिहासकारांनी सत्यता व सारासार विवेक बुद्धीने

तपासलेल्या पुराव्यांचा आधार घेऊन फलटण नाईक निंबाळकर घराण्याच्या इतिहासाला न्याय द्यावा. समारंभाचे अध्यक्ष सातारा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरेहोते. यावेळी प्रा. डॉ. चंद्रवदन नाईक,प्रा. डॉ. अरुण भोसले, प्रा.डॉ.अवनीश पाटील,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी करून राष्ट्रीय इतिहास परिषद व अधिवेशनाच्या आयोजनाचे प्रयोजन सांगितले.सातारा येथील प्राचार्य डॉ. विजयराव नलावडे यांनी बीजभाषण केले.त्यामध्ये फलटणच्या राजघराण्याचा पुरोगामी वारसा, लोकविकासक दृष्टी, शिक्षण प्रसारचे कार्य, प्रोत्साहन, सहकार्य व आधुनिक बदलाचे कार्य अधोरेखित केले.

या परिषदेतील ‘२० व्या शतकातील संस्थाने : फलटण संस्थानचा विशेष संदर्भ’ या विषयाच्या अनुषंगाने आयोजित परिषदेत इतिहास संशोधनाशी संबंधित शोधनिबंधांचे वाचन करण्यात आले. संस्थानकालीन राजकीय व सामाजिक परिस्थिती, फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याचा ऐतिहासिक वारसा आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील संस्थानांचे स्थान यांसारख्या विषयांच्या अभ्यासाला या परिषदेमुळे चालना मिळाली.

या अधिवेशनाच्या माध्यमातून इतिहास संशोधक, प्राध्यापक आणि अभ्यासकांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. इतिहास संशोधन आणि लेखन क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणारा डॉ. आ. ह. साळुंखे यांचा हा सन्मान परिषदेमधील महत्त्वपूर्ण ठरला.

या इतिहास परिषद व अधिवेशनासाठी संयोजक डॉ. ए. एस. टिके, समन्वयक प्रा. (डॉ.) एस. टी. कदम, डॉ. योगिता मठपती, प्रा. अभिजित कदम व विविध आयोजन समितीनी कष्ट घेतले.

Previous article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

0
🌺 मातृदेवता : संघर्ष, त्याग आणि कर्तृत्वाची जिवंत मूर्ती! 🌺 समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या आयुष्याला...

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात...

0
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण   शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण...

*फलटण येथे दिया मेगा फेस्टिव्हल अॅण्ड कार्निवाल फलटण २०२६ चा उद्या उद्घाटन सोहळा*

0
*फलटण येथे दिया मेगा फेस्टिव्हल अॅण्ड कार्निवाल फलटण २०२६ चा उद्या उद्घाटन सोहळा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण संकल्प ऑर्गनायझेशन बारामती लायन्स क्लब ऑफ फलटण...

error: Content is protected !!