Homeताज्या बातम्या*डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समतेसाठी संघर्ष केला प्रा.प्रभाकर पवार*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समतेसाठी संघर्ष केला प्रा.प्रभाकर पवार*

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समतेसाठी संघर्ष केला –

प्रा.डॉ.प्रभाकर पवार.

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सर्व प्रकारच्या समतेसाठी लढा देताना मानव मुक्तीची हाक दिली.त्यांची सर्व आंदोलने सामाजिक,आर्थिक व सांस्कृतिक समतेच्या पर्यावरणाची होती त्यांनी केलेले विविध लेखन व संशोधन तसेच हिंदू कोड बील निर्मिती व संविधान निर्मिती ही समतेच्या प्रस्तावपनेची गमके होती,या सर्व अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समता हेच तत्त्व शिरोधार्य मानून सर्वतोपरी संघर्ष केला,असे प्रतिपादन प्रा.डॉ.प्रभाकर पवार यांनी कुरवली(खुर्दII.) तालुका फलटण येथे केले.

“भीम गर्जना तरुण मंडळ कुरवली (खुर्दII.)” यांनी आयोजित केलेल्या ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध जयंती’, उत्सवात प्रा.डॉ.प्रभाकर पवार “डॉ.आंबेडकर काल,आज आणि उद्या”,या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी उद्योजक निलेश व

भोसले होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सीबीआय पोलीस ऑफिसर रणजित भोसले,पोलीस पाटील नानासो शेंडगे व ॲडव्होकेट अस्मिता भोसले होत्या.वरील विषयावर बोलताना प्रा.डॉ.प्रभाकर पवार पुढे म्हणाले,, डॉ. आंबेडकर हे मानवतावादी व धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व होते.भारत देशाच्या कल्याणासाठी व विकासासाठी त्यांनी प्रोत्साहन व अग्रक्रम दिला. समाजसुधारणा व आधुनिक विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवा म्हणून त्यांनी स्त्री-पुरुष समतेसह अनेक समतावादी आंदोलनांना जन्म दिला. महाडचा पाण्यासाठीचा सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, अनेक परिषदा, विविध वृतपत्राचे संपादन व शेवटी बुद्ध धम्म स्वीकार हा त्याचाच एक भाग होता.त्यांच्या या मानवमुक्तीच्या लढ्याचे जगभरातून स्वागत व कौतुक झाले.आज त्यांच्या विचारांनी देश चालविणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

अध्यक्षपदावरून बोलताना उद्योजक निलेश भोसले म्हणाले महापुरुषांच्या जयंती मधून समाज प्रबोधन झाले पाहिजे समाजाने नाच गाणी व आतिषबाजीला फाटा देऊन समाजप्रबोधन व ज्ञानग्रहणासाठी ग्रंथालयांना महत्व देऊन ती उभारली तर भावी पिढी शासकीय जमात होईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन आढाव यांनी केले.कार्यक्रमात ऍड.अस्मिता भोसले,पैलवान झेंडे यांचा यशस्वीतेबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमाला ‘दै.सांजवात’,चे पत्रकार अभिजीत सरगर ग्रामपंचायत सदस्य, तरुवर्ग, स्त्री-पुरुष,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी रणजीत भोसले यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET-UG पेपर लीक प्रकरणी CBI ने पुण्यातील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून भौतिकशास्त्राचे प्रश्न घेतलेल्या विद्यार्थ्याला अटक...

पुणे: NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मंगळवारी संध्याकाळी पुण्यातील शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांच्याकडून भौतिकशास्त्राचे प्रश्न घेतलेल्या विद्यार्थ्याला अटक केली....

30 जूनपासून BLO द्वारे 91L मतदारांची घरोघरी पडताळणी

मतदार याद्या अद्ययावत केल्या जातील पुणे : मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण जिल्ह्यात मतदार याद्यांचे विशेष सघन...

हायकोर्टाच्या आदेशानंतर राखीव कर्मचारी जनगणना ड्युटी घेऊ शकतात

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठाने अनिवार्य जनगणना कर्तव्यांसाठी खाजगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तैनात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला...

*२२ फाटा धुळदेव येथे ह.भ.प. नवनाथ कोलवडकर महाराज यांचे प्रेरणादायी प्रवचन; बाळूमामांच्या भक्तीचा, व्यसनमुक्तीचा...

२२ फाटा धुळदेव येथे ह.भ.प. नवनाथ कोलवडकर महाराज यांचे प्रेरणादायी प्रवचन; बाळूमामांच्या भक्तीचा, व्यसनमुक्तीचा व आई-वडिलांच्या सेवेचा दिला संदेश   धुळदेव प्रतिनिधी : समर्थ 24 तास...

पुण्यात पावसाळ्यापूर्वीची निकृष्ट दर्जाची कामे, पाणी साचल्याने शिवसेनेचे आंदोलन

पुणे : मान्सूनपूर्व कामांचा निकृष्ट दर्जा आणि नुकत्याच झालेल्या पावसामुळे पाणी साचल्याच्या विरोधात शिवसेना पुणे युनिटच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पुणे महानगरपालिका (पीएमसी) मुख्यालयात...

error: Content is protected !!