Homeताज्या बातम्याधुमाळवाडी दरोडा प्रकरणातील मोक्क्याचा फरार गुन्हेगार जेरबंद — फलटण ग्रामीण पोलीस ठाणे...

धुमाळवाडी दरोडा प्रकरणातील मोक्क्याचा फरार गुन्हेगार जेरबंद — फलटण ग्रामीण पोलीस ठाणे डी.बी. पथकाचे यश

फलटण दि.०५ धुमाळवाडी येथील दरोड्यासह मागील चार वर्षांपासून मोक्क्याच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार अखेर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाच्या अचूक टेहळणी व शिताफीने अटक करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलिसांना मोठे यश लाभले आहे.

दि. ०८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी सुमारास धुमाळवाडी येथील धबधबा परिसरात १० जणांच्या टोळीने पर्यटकांवर दरोडा टाकला होता. महिला पर्यटकांना लक्ष्य करत लाकडी दांडके व लोखंडी सु-यांचा धाक दाखवत गळ्यातील दागिने, रोख रक्कम आणि घड्याळ असा एकूण ₹५४,५००/- किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेण्यात आला होता.

या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. ५१०/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३१० (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी सोमेश्वर जायपत्रे हे करीत होते.

या गुन्ह्यातील आरोपी रणजित कैलास भंडलकर आणि तानाजी नाथाबा लोखंडे (दोघे रा. खामगाव, ता. फलटण) हे गुन्हा नोंद झाल्यापासून फरार होते. आरोपी रणजित भंडलकर याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, दुखापत, महिला अत्याचार असे तब्बल आठ गुन्हे दाखल असून, तो पोलीसांना चकवण्यात पटाईत होता. याच आरोपीवर मोक्क्याचा गुन्हा दाखल असून तो गेली चार वर्षे फरार होता.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी फरारी आरोपींवर विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी स.पो.नि. शिवाजी जायपत्रे यांनी विशेष पथक तयार केले.

दि. ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सांगवी (ता. फलटण) येथे आरोपी रणजित भंडलकर व तानाजी लोखंडे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचला.

पोलीस उपनिरीक्षक बदने, तसेच अमंलदार वैभव सुर्यवंशी, नितीन चतुरे, श्रीनाथ कदम, अमोल जगदाळे, हणमंत दडस, कल्पेश काशिद, तानाजी ढोले, गणेश ठोंबरे आणि अक्षय खाडे यांच्या पथकाने शिताफीने दोघांनाही अटक करून पोलीस ठाण्यात आणले.

या अचूक व नियोजनबद्ध कारवाईबद्दल फलटण ग्रामीण डी.बी. पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बेकायदेशीर डंपिंगसाठी पीएमसीने दोन वर्षांत 1,000 हून अधिक उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला

मुठा नदीपात्रात कचरा पुणे : नागरी संस्थेने, गेल्या दोन वर्षात, नाले, मोकळे भूखंड आणि नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे बांधकाम आणि विघटन कचरा टाकल्याबद्दल 1,170...

स्वच्छता आणि सुरक्षिततेवर विशेष लक्ष केंद्रित करून आळंदी वारीसाठी सज्ज झाली आहे

पुणे : 8 जुलै रोजी होणाऱ्या वार्षिक संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणुकीसाठी हजारो वारकऱ्यांना सुरक्षित आणि निर्विघ्न यात्रेची खात्री करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने...

मुलाची डायरी स्त्रीला विचित्र प्रेम, एकटेपणा आणि सामाजिक कलंक यांचा सामना करण्यास भाग पाडते

एक माधव बाग या नाटकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्री सुहिता थत्ते यांनी आज तालीम केली. पुणे : 50 मिनिटांचा एकपात्री नाटक एक माधव...

सेनेच्या (यूबीटी) 6 खासदारांशी वर्षभर चर्चा सुरू, काही आमदारही पक्ष बदलू शकतात: मावळचे खासदार...

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे पुणे : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी दावा केला की उद्धव ठाकरे...

लग्नाच्या काही महिने आधी, मंगेतरसोबत वाढदिवसाला निघालेल्या २६ वर्षीय पुण्याच्या तरुणाचा, लोहगड किल्ल्यावर ४००...

छायाचित्रे काढण्याच्या प्रयत्नात केतन विशाल अग्रवाल 400 फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर छायाचित्रे काढत...

error: Content is protected !!