नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा साधेपणा
फलटण शहर प्रतिनिधी:- जुबेरभाई कोतवाल
सहकाऱ्यांसोबत हॉटेल अतिथी येथे घेतला नाश्त्याचा आस्वाद
फलटण नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री.समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आज दिवसभराच्या धावपळीतून आपली कामे करून, नगरपालिकेची सर्वसाधारण सभेचे कामकाज पाहून, आळंदी येथून आलेल्या देवस्थान विश्वस्तांच्या समवेत पालखी नियोजनाचा आढावा घेतला.
नगराध्यक्षांनी आपल्या धावपळीच्या कामातून वेळात वेळ काढून सहकाऱ्यांसमवेत आज हॉटेल अतिथी नाश्त्याचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी होते. यामध्ये नगरसेवक अमोल सस्ते, राहुल निंबाळकर, सचिन अहिवळे, किरण राऊत, संदीप चोरमले, आप्पा मांढरे हे उपस्थित होते.


























