Homeताज्या बातम्यापत्रकार अभिजीत लेंभे व सामाजिक कार्यकर्ते रणजीत बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान...

पत्रकार अभिजीत लेंभे व सामाजिक कार्यकर्ते रणजीत बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कोरेगाव : सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्याऐवजी समाजकार्यासाठी योगदान देण्याचा आदर्शवत उपक्रम पत्रकार अभिजीत लेंभे व सामाजिक कार्यकर्ते रणजीत बागडे यांनी राबवला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सलग सहाव्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक कार्याचा स्तुत्य पायंडा पाडला.

हे शिबिर ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक येथे छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य, केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार सर्कलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

शिबिरात डॉ. अतुल लिपारे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने कार्य केले. एकूण ४२ महिला व पुरुष दात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. विशेष म्हणजे महिलांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावून समाजासाठी योगदान दिले. प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी डॉ. अतुल लिपारे यांनी अभिजीत लेंभे व रणजीत बागडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांचा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास डॉ. हर्षल जगदाळे, डॉ. बाळासाहेब क्षत्रिय, योगेश कांबळे, किरण जगताप, युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रवीण निकम, भाजप नेते अनिल शिंदे, भाजप पंचायत राज व ग्रामविकास विभाग सातारा जिल्हा उपाध्यक्ष शेखर काटकर, सरपंच संतोष मांहगडे, माजी सरपंच सुरेश काटकर, प्रशांत निकम (सर), गणेश महाजन, सुमित खुडे, रवींद्र केंजळे, मंगेश गार्डी, दीपक ढोले आणि सूरज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुधोजी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वैभवात भर प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ पुस्तकाचे...

0
मुधोजी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वैभवात भर प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ पुस्तकाचे प्रकाशन. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण : शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय शैक्षणिक...

सौ. प्रिया अमोल नाळे-बोराटे यांची राज्य स्तरावर ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड जिल्हा परिषद...

0
सौ. प्रिया अमोल नाळे-बोराटे यांची राज्य स्तरावर 'आयडॉल शिक्षक' म्हणून निवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोजूबावी येथील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका यांच्या शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर...

फलटण शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम उद्या, मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात...

0
फलटण शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम उद्या, मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार असल्याने संपूर्ण फलटण नगरपरिषद हद्दीतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. समर्थ...

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ९६.०९ टक्के विक्रमी मतदान! २,०२१ पैकी १,९४२ मतदारांनी बजावला...

0
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ९६.०९ टक्के विक्रमी मतदान! २,०२१ पैकी १,९४२ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; फलटणमध्ये ९५.८२ टक्के, तर कोरेगावमध्ये १०० टक्के मतदान सातारा | दि....

मुधोजी महाविद्यालयात ‘सुटा’ संघटनेच्या वतीने शासनाचा निषेध ३१ ऑक्टोबर काळा दिवस म्हणून पाळला; जुनी...

0
मुधोजी महाविद्यालयात 'सुटा' संघटनेच्या वतीने शासनाचा निषेध ३१ ऑक्टोबर काळा दिवस म्हणून पाळला; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण,दि.३१ ऑक्टोबर :...

error: Content is protected !!