Homeताज्या बातम्यापत्रकार अभिजीत लेंभे व सामाजिक कार्यकर्ते रणजीत बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान...

पत्रकार अभिजीत लेंभे व सामाजिक कार्यकर्ते रणजीत बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कोरेगाव : सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्याऐवजी समाजकार्यासाठी योगदान देण्याचा आदर्शवत उपक्रम पत्रकार अभिजीत लेंभे व सामाजिक कार्यकर्ते रणजीत बागडे यांनी राबवला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सलग सहाव्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक कार्याचा स्तुत्य पायंडा पाडला.

हे शिबिर ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक येथे छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य, केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार सर्कलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

शिबिरात डॉ. अतुल लिपारे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने कार्य केले. एकूण ४२ महिला व पुरुष दात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. विशेष म्हणजे महिलांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावून समाजासाठी योगदान दिले. प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी डॉ. अतुल लिपारे यांनी अभिजीत लेंभे व रणजीत बागडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांचा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास डॉ. हर्षल जगदाळे, डॉ. बाळासाहेब क्षत्रिय, योगेश कांबळे, किरण जगताप, युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रवीण निकम, भाजप नेते अनिल शिंदे, भाजप पंचायत राज व ग्रामविकास विभाग सातारा जिल्हा उपाध्यक्ष शेखर काटकर, सरपंच संतोष मांहगडे, माजी सरपंच सुरेश काटकर, प्रशांत निकम (सर), गणेश महाजन, सुमित खुडे, रवींद्र केंजळे, मंगेश गार्डी, दीपक ढोले आणि सूरज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा* *रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप...

संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप शिंदे खजिनदार; लायन्स क्लब फलटणची नवी कार्यकारिणी पदस्थ   फलटण, प्रतिनिधी : समर्थ...

नाल्यांमध्ये अडकलेल्या गौरची वन पथकाने सुटका केली

गौर आपल्या कळपापासून विभक्त होऊन शहरी किनाऱ्याजवळ राहिली असावी. अन्न किंवा पाण्याच्या शोधात ते शहरात दाखल झाले असावे पुणे : सिंहगड रोडवरील विश्रांतीनगर...

किरकोळ टेम्पोसह चार वाहनांना धडक, बुक

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर वैदूवाडी येथे मंगळवारी सायंकाळी एका १७ वर्षीय मुलाने पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी चालवत असलेल्या टेम्पोने चार वाहनांना धडक दिली.वानवरी...

पुण्यातील नवीन कार्यालयासह भारतातील 500 अभियंत्यांपर्यंत कर्मचारी संख्या वाढवण्याचे जॅमकोचे उद्दिष्ट आहे

केट शेफर, कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ, जॅमको इंटिरियर्स (उजवीकडे); संजीव सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी (मध्य), जॅमको इंटिरिअर्स, नीलेश बोराडे, कंट्री हेड इंडिया, जॅमको...

*फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती*

फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती     फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण नगर...

error: Content is protected !!