फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र!
दिवाळी पाडव्यानिमित्त रविवार पेठेतील तालीम चौकात आकर्षक रोषणाई; आकाशकंदील पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण
दिवाळी सणाचे औचित्य साधून फलटण शहरातील श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळ, रविवार पेठ, तालीम चौक यांच्या वतीने यंदा दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने तब्बल १५ फुटी भव्य आणि आकर्षक आकाशकंदील उभारण्यात आला आहे. फलटण शहरात प्रथमच एवढ्या भव्य आकाराचा आकाशकंदील साकारण्यात आल्याने तो सध्या शहरवासीयांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

दिवाळीच्या मंगलमय वातावरणात मंडळाने केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे रविवार पेठ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आकर्षक सजावट, भव्य आकार आणि विद्युत रोषणाईने सजलेला हा आकाशकंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा भव्य आकाशकंदील पाहण्यासाठी फलटण शहरासह परिसरातील नागरिक, महिला, युवक आणि लहान मुले मोठ्या संख्येने तालीम चौक येथे भेट देत आहेत. नागरिक आकाशकंदिलासोबत छायाचित्रे काढून या सुंदर क्षणांच्या आठवणी जपत आहेत.
सण-उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, आनंद आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे काम श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळ सातत्याने करत आहे. मंडळाच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे फलटण शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळ, रविवार पेठ, तालीम चौक, फलटण यांच्या या भव्य दिवाळी उपक्रमामुळे यंदाची दिवाळी शहरवासीयांसाठी विशेष आकर्षणाची ठरत आहे.
🪔 सर्व फलटणकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔


























