Homeताज्या बातम्या*फलटण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात...

*फलटण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात आयोजित करण्यात आलेला आंबेडकर जयंती महोत्सव अत्यंत भव्य, देखणा आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या महोत्सवाचे अrध्यक्ष हरिष काकडे (आप्पा) यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते, ज्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. *

फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव भव्य उत्साहात संपन्न

फलटण. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात आयोजित करण्यात आलेला आंबेडकर जयंती महोत्सव अत्यंत भव्य, देखणा आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या महोत्सवाचे अध्यक्ष हरिष काकडे (आप्पा) यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते, ज्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

शहरातील बारामती पूल ते पंचायत समिती फलटण तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पुढे महावीर स्तंभ परिसरात उभारण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेत होती. शहरातील प्रत्येक गल्ली-बोळ प्रकाशमय झाला होता.

यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे आंबेडकर चौकात उभारण्यात आलेली कोलंबिया युनिव्हर्सिटी लायब्ररीची भव्य प्रतिकृती. बाबासाहेबांनी शिक्षण घेतलेल्या या ऐतिहासिक स्थळाची साकारलेली प्रतिकृती नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. यासोबतच तथागत भगवान बुद्धांची मूर्ती आणि आकर्षक सजावट यामुळे परिसर अधिकच देखणा झाला होता.

जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीतून बाबासाहेबांच्या महान कार्याचा प्रभावी परिचय जनतेसमोर मांडण्यात आला. त्यांच्या कायदेविषयक योगदानामुळे महिलांना मिळालेला सन्मान तसेच त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याचेही प्रभावी सादरीकरण करण्यात आले.

महोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमुळे शहरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

या यशस्वी आयोजनामागे हरिष काकडे (आप्पा), शशीकांत अहिवळे, सुजल गायकवाड, स्वप्निल काकडे, आदर्श अहिवळे, साहिल अहिवळे, संघर्ष अहिवळे, संघराज अहिवळे, रोनित अहिवळे, अमर अहिवळे, प्रेम अहिवळे, विराज घोडके, अनिकेत अहिवळे, निसर्ग अहिवळे, साईराज कांबळे, संविधान काकडे तसेच संपूर्ण जयंती समिती सदस्यांचे अथक परिश्रम, जिद्द आणि उत्कृष्ट टीमवर्क कारणीभूत ठरले.

तसेच माजी नगरसेवक सनीदादा अहिवळे, नगरसेवक सचीन (सर) अहिवळे यांचे विशेष सहकार्य लाभले. शक्ती भोसले, चेअरमन सुधीर अहिवळे, सुनिलनाना अहिवळे, सनी काकडे, अमर सोरटे, विशाल पाटील, जयकुमार रणदिवे, विकी काकडे, अशय अहिवळे, दया पडकर, सागरदादा सोरटे, सिद्धार्थ अहिवळे, प्रजन्य अहिवळे, संग्राम अहिवळे, रोहित गायकवाड, प्रणव जीवन काकडे, उमेश कांबळे, विशाल काकडे, कुणाल काकडे, बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते, कपील काकडे, गणेश अहिवळे, महादेव गायकवाड, सनी मोरे, विकी बोके, अमोल अहिवळे, सुशांत अहिवळे, मिलिंद भोसले, किरण सर अहिवळे तसेच विविध मित्र मंडळांचे मोलाचे योगदान लाभले.

भीमाई मित्र मंडळ, पंचशील मित्र मंडळ, रमाई मित्र मंडळ, ‘आपलं भीम नगर’ आणि ‘भीम योद्धा मित्र मंडळ’ यांच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर मेहनत घेऊन सजावट व ध्वज लावण्याचे कार्य पार पाडले.एकूणच, आंबेडकर जयंती महोत्सव हा फलटण शहरासाठी प्रेरणादायी, आदर्श आणि कायम स्मरणात राहणारा उत्सव ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

फॅक्टरी फ्लोअर्सपासून फ्रंटलाइन्सपर्यंत, ह्युमनॉइड रोबोट्स ग्राउंड मिळवतात

1920 मध्ये, "रोबोट" या शब्दाची झेक नाटकात पदार्पण झाली; 106 वर्षांनंतर रोबोटने युद्धभूमीवर पदार्पण केले.या जानेवारीत, रशियन सैनिक मानवरहित, सशस्त्र युक्रेनियन रोबोटला आत्मसमर्पण करतानाचे...

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत 90 किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते

चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

पुण्यातील काही भागात कमी पावसानंतर आठवडाभरात पावसाची नोंद झाली

कोथरूडमध्ये रविवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या पुणे : मान्सूनच्या जवळपास आठवडाभराच्या मंद गतीनंतर पुणे आणि आसपासच्या भागात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली,...

error: Content is protected !!