Homeताज्या बातम्या*फलटण येथील श्रीराम विद्या भवन येथे विद्यार्थी पालक मेळावा संपन्न* *जागतिक...

*फलटण येथील श्रीराम विद्या भवन येथे विद्यार्थी पालक मेळावा संपन्न* *जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*

फलटण येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेत महिला पालकांसाठी अत्यंत वेगळ्या आणि उपक्रमशील पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी महिला पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.विविध स्पर्धांच्या विजेत्या महिलांमधून चिट्टीद्वारे भारती उदय पुजारी या पैठणीच्या मानकरी ठरल्या.

फलटण येथील श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेत महिला पालकांसाठी संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात,प्रश्नमंजुषा,चेंडू नेमबाजी, उखाणे,हनुमान नरसिंह action आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय शाळा समितीच्या अध्यक्ष अलका बेडकिहाळ,इंटेरियर डिझाईनर चंदाताई जाधव,भूलतज्ञ डॉ.सुनिता निंबाळकर,एसबीआईच्या रूपालीताई काकडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक भिवा जगताप,बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवले उपस्थित होत्या.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत अंजली सागर शिंदे,तळ्यात मळ्यात पूजा निलेश पालकर,संगीत खुर्ची प्रमिला धायगुडे,ॲक्शन स्पर्धा अर्चना अहिवळे,चेंडू नेमबाजी अनिता अर्जुन पवार,उखाणा स्पर्धेत भारती उदय पुजारी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.या विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या 20 महिलांमधून चिठ्ठ्याद्वारे पाच भाग्यवान महिला निवडण्यात आल्या.या पाच भाग्यवान महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी अलका बेडकिहाळ,चंदाताई जाधव, डॉ.सुनिता निंबाळकर,रूपालीताई काकडे यांनी उपस्थित माता पालकांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेतले.या संवादातून महिलांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा मिळाल्याची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली.

लांबलचक उखाणा ही स्पर्धा अतिशय आकर्षक ठरली.यातून उपस्थितांना मराठी संस्कृतीचे सौदर्य दर्शन घडवले.याशिवाय अचानक स्वतः जवळील वस्तू दाखवणे,

हनुमान नरसिंह झटपट कृती,संगित खुर्ची,प्रश्नमंजुषा,तळयात मळ्यात,चेंडू नेमबाजी आदी स्पर्धांसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धांचा महिलांनी मनसोक्त आनंद घेतला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपाली निंबाळकर, विजया भोसले,हेमलता गुंजवटे,निलिमा मगदूम,शमीम शेख,निकिता कुलकर्णी,

संतोषी हजारे,ज्योती शिंदे,पूजा जाधव,मीना मदने यांनी विशेष परिश्रम घेतले.दिपाली निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

फलटण : भारती पुजारी यांना पैठणी प्रदान करताना अलका बेडकीहाळ,अन्य विजेत्या महिला आणि शिक्षक वृंद.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नाही, विरोधाचा इशारा

एमपीसीसी प्रमुख हर्षवर्धन सपकाळ पुणे : एमव्हीए सदस्य आणि शेतकरी कार्यकर्त्यांनी शेततळ्यांच्या दुर्दशेवर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई करून...

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; पाणी साचले, वाहतूक कोंडी शहर ठप्प; पूरग्रस्त भागातून ४९२ कुटुंबांचे...

मुसळधार पावसामुळे पुण्यात पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) मान्सूनपूर्व तयारीमधील उणिवा उघड करत, मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, वाहतूक...

वायू आणि जलप्रदूषणावर एमपीसीबीने बारामती ॲग्रोला पाठवली नोटीस | पुणे बातम्या

पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मंगळवारी राष्ट्रवादीचे (SP) आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो शुगर अँड डिस्टिलरी युनिटला...

भाजप आमदार मुळशी धरणाच्या पाण्याचा शहरासाठी वापर करणार, मंत्री म्हणतात या आठवड्यात बैठक

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाचे बॅकवॉटर पुणे : मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी मिळावे, असा प्रलंबित प्रस्ताव दौंडचे भाजप आमदार राहुल कूल यांनी बुधवारी...

पुणे-मुंबई घाट विभागात भूस्खलनाने प्रभावित झालेल्या तीनपैकी एक रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला

पुणे: ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल दरम्यानच्या भूस्खलनग्रस्त विभागातील तीन रेल्वे मार्गांपैकी एक मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री साफ केल्याने पुणे-मुंबई दरम्यानच्या...

error: Content is protected !!