Homeताज्या बातम्या*महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत...

*महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण*

ब्रेकिंग न्यूज
पुणेकरांचा मुलगा लोहगड किल्ल्यावर 400 फूट पडून अपघात नव्हे खून; मंगेतर आणि तिच्या पुरुष मित्राला ताब्यात घेतले*महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण*AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारीपुणे शहरातील ट्रॅफिक जॅममागील ६० पायाभूत आणि संबंधित समस्या पोलीस ओळखतात, सुधारात्मक उपायांसाठी पुणे महानगरपालिकेशी संपर्क साधतातपुणे महापालिकेत विरोधी नगरसेवकांनी सभागृहात हेल्मेट घातले, भाजपची धमकी*श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चे,* *श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यामंदिर ,फलटण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साही* *वातावरणात साजरा करण्यात* *आला**आचार्य बाळशास्त्री जांभेकर हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. “योग करा, निरोगी रहा” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे सादरीकरण केले.*उच्च परताव्याचे आमिष दाखवून किमान 22 गुंतवणूकदारांची 5 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मान कुटुंबातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली.कमी साठ्याच्या दरम्यान पर्यायी दिवसाच्या पाणीपुरवठ्याला सामोरे जाण्यासाठी पुणे रहिवासी आपली दिनचर्या, जीवनशैली बदलतातविलंबाने, पण मान्सूनपूर्व सरी रहिवाशांना दिलासा आणि आशा देतात

*महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

फलटण : सुवर्ण परिस स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा शबाना पठाण यांच्या पुढाकारातून सातारा जिल्ह्यात प्रथमच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त महिलांसाठी विशेष कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात आला.

महिला व मुलींना आत्मनिर्भर आणि सक्षम बनविण्याच्या उद्देशाने फाउंडेशनतर्फे एक महिन्याचा बेसिक मेहंदी प्रशिक्षण वर्ग तसेच तीन दिवसीय साडी ड्रेपिंग (साडी ड्रेसिंग) प्रशिक्षण वर्ग पूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकूण ७८ महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी संस्थेच्या वतीने महिलांना केवळ कौशल्य प्रशिक्षणच देण्यात आले नाही, तर त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. ॲड. मयुरी शहा यांनी महिलांसाठी विशेष एक तासाचे व्याख्यान घेत विविध महिला कायदे, हक्क, संरक्षणात्मक तरतुदी तसेच न्याय मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.

यावेळी फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, “स्त्री शिक्षित झाली तर समाज प्रगल्भ होतो आणि स्त्री सक्षम झाली तर राष्ट्र समृद्ध होते,” या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना अनुसरून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

फलटण तालुक्यातील या उपक्रमाला महिलावर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फाउंडेशनच्या अध्यक्षा शबाना पठाण यांनी सांगितले की, महिलांना आत्मनिर्भर व सक्षम बनविणे हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई आणि माता रमाई यांसारख्या थोर महिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य संस्था करत आहे. केवळ जयंती आणि पुण्यतिथी साजऱ्या करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रांजली ज्योतिबा जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सिद्धी दयानंद कवितके यांनी द्वितीय क्रमांक मिळविला, तर अमीना सलीम शेख यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.

महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या शबाना पठाण या सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जपत समाजकार्य करत आहेत. या उपक्रमातून अनेक महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या शबाना इनामदार, शीतल भोसले आणि रेश्मा कवितके यांचे फाउंडेशनतर्फे आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणेकरांचा मुलगा लोहगड किल्ल्यावर 400 फूट पडून अपघात नव्हे खून; मंगेतर आणि तिच्या पुरुष...

लोहगड किल्ल्यावरील पुण्यातील एका ट्रेकरच्या (एल) मृत्यूने सुरुवातीला अपघाती वळण घेतले आहे. पोलिसांना आता संशय आहे की त्याची मंगेतर (आर) आणि तिच्या पुरुष...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

पुणे शहरातील ट्रॅफिक जॅममागील ६० पायाभूत आणि संबंधित समस्या पोलीस ओळखतात, सुधारात्मक उपायांसाठी पुणे...

पोलिसांनी खड्डे बुजवणे, रस्ता दुभाजकांचे सदोष दुरुस्त करणे, पदपथांची पुनर्रचना करणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिक्रमणे हटवणे या उपायांची शिफारस केली आहे. पुणे...

पुणे महापालिकेत विरोधी नगरसेवकांनी सभागृहात हेल्मेट घातले, भाजपची धमकी

विरोधी नगरसेवक सभागृहात हेल्मेट घालतात पुणे: भाजप सदस्यांच्या “आक्रमक आणि धमकावणाऱ्या” वागणुकीला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) च्या विरोधी नगरसेवकांनी बांधकाम...

*श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चे,* *श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यामंदिर ,फलटण येथे ...

*श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चे,* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण *श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यामंदिर ,फलटण येथे आज दिनांक २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन...

error: Content is protected !!