Homeताज्या बातम्यारमाईंच्या त्यागामुळेच बाबासाहेब महानतेच्या शिखरावर! – प्रवचनकार आयु. सोमिनाथ घोरपडे

रमाईंच्या त्यागामुळेच बाबासाहेब महानतेच्या शिखरावर! – प्रवचनकार आयु. सोमिनाथ घोरपडे

फलटण दि.२९ (प्रतिनिधी) – भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील सोळावे पुष्प मौजे समतानगर (विडणी) येथे भावपूर्ण वातावरणात गुंफण्यात आले. धम्मगुरू पूज्य भदंत काश्यप यांना पंचांग प्रणाम करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या वेळी “त्यागमूर्ती माता रमाई यांचे जीवनचरित्र” या विषयावर प्रेरणादायी प्रवचन फलटण तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बौद्ध धम्माचे पहिले रोपटे लावणारे व त्याला वटवृक्षात रूपांतरित करणारे प्रवचनकार आयु. सोमिनाथ घोरपडे सर यांनी दिले.

त्यांनी रमाईंचा त्यागमय जीवनाचा पट उलगडून दाखवला. बाबासाहेबांच्या शिक्षणप्रवासात रमाईंचा त्याग, गरिबीतूनही दाखवलेले धैर्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलत पतीच्या महान कार्यासाठी दिलेली साथ या सगळ्या प्रसंगांनी उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणले.थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्यनी माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक…’’अशी भावना व्यक्त केली.

पूज्य भदंत काश्यप यांनी उपासकाने भिक्षूंना केलेली याचना पाली भाषेत सादर करून तिचे सविस्तर विश्लेषण केले.हीच याचना बौद्ध उपासकाच्या जीवनातील प्रारंभबिंदू असून त्यातून नैतिक, सामाजिक व आध्यात्मिक शिस्त अंगीकारली जाते.याचनामधील पाली भाषेतील शब्द साधे असले तरी त्यांच्या मागील अर्थामुळे उपासकाच्या जीवनात प्रचंड परिवर्तन घडते. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव सर यांनी रमाईच्या जीवन कार्यांवर प्रकाश टाकणारे सुंदर गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

या प्रसंगी फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव सर, महासचिव आयु. बाबासाहेब जगताप सर, कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे सर, संस्कार सचिव आयु. बजरंग गायकवाड सर, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे सर, पंचशील मित्र मंडळाचे पदाधिकारी तसेच बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार सचिव आयु. बजरंग गायकवाड सर यांनी केले.

प्रवचनानंतर उपस्थितांनी माता रमाईंना वंदन करून त्यांच्या त्यागमय जीवनातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याला जाणारा पाळीव प्राणी लॅब्राडॉरचा रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू, मालकाचा रेल्वेच्या चुकांचा आणि शरीराची असंवेदनशील...

पाळीव प्राणी मालकाने प्राणी हक्क कार्यकर्त्या आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी मे महिन्यात रेल्वेमंत्र्यांना या घटनेची चौकशी करण्याची...

सस्तेवाडीत गावठी हातभट्टीवर पोलिसांचा धडक छापा; १.१६ लाखांचा मुद्देमाल नष्ट

सस्तेवाडीत गावठी हातभट्टीवर पोलिसांचा धडक छापा; १.१६ लाखांचा मुद्देमाल नष्ट समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क दि. ३० (प्रतिनिधी) : फलटण ग्रामीण पोलिसांनी सस्तेवाडी परिसरात अवैध...

अति उष्णतेमुळे टेकड्यांवर आणि बागांमध्ये उन्हाळ्यात फुलपाखरांचे दर्शन कमी होते

निसर्गवादी आणि फुलपाखरू पाहणारे गेल्या उन्हाळ्याच्या तुलनेत कमी क्रियाकलाप नोंदवत आहेत पुणे : सततच्या तीव्र उष्णतेचा या हंगामात फुलपाखरांच्या दर्शनावर विपरित परिणाम झाला...

पुणे-पिंपरी चिंचवड हूच शोकांतिका: आरोपीने मिथेनॉलसह देशी बनावटीची दारू ऑनलाइन मागवली, असे पोलिसांचे म्हणणे...

दारू विक्रेते कर्नैलसिंग विरका यांचे घर, फुगेवाडी (लि), पिंपरी चिंचवड पोलीस (रा.) यांच्याकडील आरोपी पुणे - फुगेवाडी आणि हडपसर येथील १५ जणांसाठी प्राणघातक...

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हडपसर दारूच्या अड्ड्याची तोडफोड; विरोधकांनी मृत्यूसाठी सरकारच्या निष्क्रियतेला जबाबदार धरले

पुणे पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचे राष्ट्रवादीचे (एसपी) आमदार रोहित पवार म्हणाले पुणे : पिंपरी चिंचवड आणि पुण्यात बनावट दारूच्या सेवनामुळे...

error: Content is protected !!