Homeताज्या बातम्या*सचिन कांबळे पाटील यांच्या पुढाकारातून ‘मुलगी वाचवा जनआंदोलन’ दिंडी; विठ्ठल-रुक्माईच्या चरणी कन्यारक्षणाची...

*सचिन कांबळे पाटील यांच्या पुढाकारातून ‘मुलगी वाचवा जनआंदोलन’ दिंडी; विठ्ठल-रुक्माईच्या चरणी कन्यारक्षणाची प्रार्थना*

सचिन कांबळे पाटील यांच्या पुढाकारातून ‘मुलगी वाचवा जनआंदोलन’ दिंडी; विठ्ठल-रुक्माईच्या चरणी कन्यारक्षणाची प्रार्थना

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

फलटण, प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पवित्र वातावरणात समाजप्रबोधनाचा संदेश देत “मुलगी वाचवा जनआंदोलन” अंतर्गत जनजागृती दिंडीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचा आणि प्रत्येक मुलीला जन्माचा, शिक्षणाचा व सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, असा प्रभावी संदेश देण्यात आला.

वारकरी संप्रदायात रुक्मिणी मातेचे स्थान अत्यंत पूजनीय आहे. विठ्ठल आणि रुक्माई हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. मग समाजात मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव का, असा प्रश्न उपस्थित करत उपस्थितांनी प्रत्यक्ष विठ्ठल-पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले. “प्रत्येक कन्येचे रक्षण होवो, स्त्रीभ्रूणहत्यामुक्त समाज घडो,” अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

या प्रेरणादायी दिंडीत फलटणचे लोकप्रिय आमदार सचिन पाटील, फलटणमधील अनेक डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी, वारकरी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. समाजातील कन्याभ्रूणहत्येसारख्या अमानुष प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहभाग नोंदविला.

या उपक्रमाचे आयोजन फलटण मेडिकल असोसिएशन, फलटण डॉक्टर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन (फलटण शाखा) आणि निकोप हॉस्पिटल, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. तसेच बेटी बचाव जनआंदोलनाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जे. टी. पोळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या वेळी सचिन कांबळे पाटील यांनी सांगितले की, “जशी रुक्माई विठ्ठलाची शोभा आहे, तशीच प्रत्येक मुलगी आपल्या कुटुंबाची, समाजाची आणि राष्ट्राची शान आहे. प्रत्येक कन्येला सुरक्षित जन्म, शिक्षण आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे ही काळाची गरज आहे.”

या दिंडीमुळे पालखी सोहळ्यात भक्तीबरोबरच सामाजिक प्रबोधनाचाही प्रभावी संदेश देण्यात आला. उपस्थितांनी “विठ्ठल-रुक्माई माऊली… प्रत्येक कन्येचे रक्षण कर!” असा जयघोष करत मुलगी वाचवण्याचा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

# *शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे आंदोलकांना...

0
# शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे आंदोलकांना संबोधन   **गाडीच्या टपावर उभे राहून आंदोलकांशी साधला संवाद; परिसरात राजकीय वातावरण...

*बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती*

0
बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे बरड येथे...

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण*

0
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत...

*मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश* *लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध...

0
मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध कला प्रकारांतही उल्लेखनीय कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर...

*धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल*! *प्रभाग क्रमांक १८५ आणि...

0
धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल! समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. मुंबई प्रभाग क्रमांक १८५ आणि ९० फूट मार्गावरील कचरा न उचलल्याने नागरिक...

error: Content is protected !!