मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६’ अंतर्गत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 (२०२६-२७)’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह आमदार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविणे, लोकसहभागातून विकासकामांना गती देणे आणि ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.


























