Homeताज्या बातम्यासाताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, संगम माहुली, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा...

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, संगम माहुली, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

साताऱ्यातील संगम माहुलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील मंदिर जीर्णोद्धार, समाधी स्थळ संवर्धन, घाट परिसर विकासाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

अजिंक्यतारा किल्ल्यातील राजसदर, बुरुज, तटबंदीच्या दुरुस्ती कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

मुंबई दि.७ : – साताऱ्यातील संगम माहुलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई, पहिले शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचे जतन आणि संवर्धन, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण, संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या स्थळांच्या परिसराचा पुनर्विकास करताना तेथील परिसर, समाधी स्थळ, प्राचीन वास्तूंचं मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत संगम माहुली, सातारा येथे महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई आणि पहिले शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे संवर्धन, जिर्णोद्धार आणि जमीन विकसित करणे, साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला सुशोभीकरण,मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक या स्थळांच्या परिसर विकासाबाबत आढावा घेण्यात आला.

या सर्व ऐतिहासिक स्थळांचा पुनर्विकास करताना पुढील शंभर वर्षे टिकेल अशी वास्तू उभारावी.त्या ठिकाणी पुरेसे वृक्षारोपण करावे, स्वच्छता राखावी, पर्यटन आणि व्यावसायिक दृष्टिकोनही ठेवावा, भविष्यातील देखभाल – दुरुस्ती बाबतही आतापासूनच उपाययोजना करावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

संगमेश्वर येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातही या बैठकीत आढावा घेण्यात आला आणि आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता,नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसचिव नंदा राऊत,पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे हे मंत्रालयातून तर पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वच्छता आणि सुरक्षिततेवर विशेष लक्ष केंद्रित करून आळंदी वारीसाठी सज्ज झाली आहे

पुणे : 8 जुलै रोजी होणाऱ्या वार्षिक संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणुकीसाठी हजारो वारकऱ्यांना सुरक्षित आणि निर्विघ्न यात्रेची खात्री करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने...

मुलाची डायरी स्त्रीला विचित्र प्रेम, एकटेपणा आणि सामाजिक कलंक यांचा सामना करण्यास भाग पाडते

एक माधव बाग या नाटकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्री सुहिता थत्ते यांनी आज तालीम केली. पुणे : 50 मिनिटांचा एकपात्री नाटक एक माधव...

सेनेच्या (यूबीटी) 6 खासदारांशी वर्षभर चर्चा सुरू, काही आमदारही पक्ष बदलू शकतात: मावळचे खासदार...

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे पुणे : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी दावा केला की उद्धव ठाकरे...

लग्नाच्या काही महिने आधी, मंगेतरसोबत वाढदिवसाला निघालेल्या २६ वर्षीय पुण्याच्या तरुणाचा, लोहगड किल्ल्यावर ४००...

छायाचित्रे काढण्याच्या प्रयत्नात केतन विशाल अग्रवाल 400 फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर छायाचित्रे काढत...

सेना (UBT) दोन खासदारांना मागे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे

सेनेचे (UBT) आमदार अंबादास दानवे आणि आमदार कैलास पाटील यांना उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि मुंबई ईशान्येचे खासदार संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क...

error: Content is protected !!