Homeताज्या बातम्या*स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी"*

*स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी”*

“स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी”

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

फलटण, दि. ३ जुलै : राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेबाबत गंभीर आक्षेप नोंदवत संबंधित महावितरण अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्यभर वीज ग्राहकांच्या घरातील कार्यरत मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविली जात असून यासाठी ग्राहकांना संदेशही पाठविले जात आहेत. मात्र, स्मार्ट मीटरबाबत देशभरात आक्षेप व विरोध नोंदविण्यात आला असून त्यासंदर्भातील शासनाच्या धोरणांबाबत स्पष्टता नसताना ही मोहीम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संसद व राज्य शासनाकडून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत सक्तीचा कोणताही आदेश नसल्याचे सांगत संबंधित अधिकारी कोणत्या अधिकाराखाली ही मोहीम राबवत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यातील विविध महावितरण कार्यालयांमध्ये उपलब्ध असलेले स्मार्ट मीटर तात्पुरते जप्त करून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, जेणेकरून शासनाच्या स्पष्ट आदेशाशिवाय त्यांची बसवणी होणार नाही, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

या प्रकरणाची न्यायालयाने स्वतःहून (सुओ मोटू) दखल घ्यावी तसेच राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाला आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी ॲड. कांचनकन्होजा खरात यांनी केली आहे. यावेळी सौ. रेश्मा पठाण या उपस्थित होत्या.

टीप : वरील बातमी ही ॲड. कांचनकन्होजा खरात यांनी केलेल्या निवेदनातील दाव्यांवर आधारित असून त्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगार महिलांकडून माळजाई मंदिरात उत्साहात महाआरती आणि महाप्रसाद

0
फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगार महिलांकडून माळजाई मंदिरात उत्साहात महाआरती आणि महाप्रसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण नगरपरिषदेच्या सर्व महिला सफाई कामगारांनी श्री माळजाई मंदिर परिसर...

कर्जदारांच्या वेदना कोण समजून घेणार? आर्थिक संकटग्रस्त कुटुंबांना न्यायाची प्रतीक्षा!

0
कायदेशीर हक्क, प्रक्रिया, कागदपत्रांची सत्यता आणि सक्षम प्राधिकरणाचे आदेश यांचे पालन झाले पाहिजेत. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण " लाखो रुपयांच्या कर्जासाठी कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेची लूट...

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या दरात जोरदार...

0
फलटण कृषी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. बाजारात १५१४ पिशव्यांची म्हणजेच...

मुधोजी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन फलटण:

0
मुधोजी महाविद्यालयात 'वाचन प्रेरणा दिन' निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फ. ए. सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग...

🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर...

0
🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; सर्पदंश व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत...

error: Content is protected !!