Homeताज्या बातम्या*"कसबा व चाणक्य न्यूजच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत!" - रणजितदादा*

*”कसबा व चाणक्य न्यूजच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत!” – रणजितदादा*

*”कसबा व चाणक्य न्यूजच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत!” – रणजितदादा*

फलटण, समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

सातारा व पुणे जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असणाऱ्या ‘कसबा न्यूज’ व ‘चाणक्य न्यूज’ या वृत्तमाध्यमांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, सामाजिक घडामोडी आणि विकासकामे अत्यंत प्रभावीपणे जनतेसमोर मांडली आहेत. या माध्यमांचे संस्थापक योगेश गंगतीरे हे हे कार्य अत्यंत सक्षमपणे करीत आहेत. त्यांच्या या कार्यास आमच्या कायम सदिच्छा असून, कसबा न्यूज व चाणक्य न्यूजच्या सोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे ठाम मत भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक घडामोडी, विकासकामे आणि जनतेच्या विविध समस्यांना न्याय देण्याचे काम करणाऱ्या ‘कसबा न्यूज’ व ‘चाणक्य न्यूज’ या वृत्तमाध्यमांच्या वर्धापन दिनानिमित्त माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या माध्यमांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

*डिजिटल युगात सत्य आणि निष्पक्ष पत्रकारिता*

आपल्या शुभेच्छा संदेशात बोलताना ते म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात वृत्तमाध्यमांची जबाबदारी अधिक वाढली आहे. अशा काळात सत्य, निष्पक्ष आणि लोकहिताच्या बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य कसबा न्यूज आणि चाणक्य न्यूज करत आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी, तसेच विकासात्मक उपक्रमांना योग्य ती प्रसिद्धी देण्यासाठी या माध्यमांनी आतापर्यंत उल्लेखनीय योगदान दिले आहे.

*लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांचे कौतुक*

पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील सकारात्मक बदल घडवून आणण्यामध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडताना कसबा न्यूज व चाणक्य न्यूज यांनी आपली विश्वासार्हता जपत जनतेचा मोठा विश्वास संपादन केला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

यापुढील काळातही या दोन्ही वृत्तमाध्यमांनी लोकहित, सामाजिक बांधिलकी आणि आपली निर्भीड पत्रकारिता जपत अधिक उंची गाठावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी संपूर्ण संपादकीय टीम, प्रतिनिधी, तांत्रिक कर्मचारी तसेच वाचक व प्रेक्षकांना वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इच्छुक तंत्रज्ञांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दोन रिक्रूटमेंट फर्म संचालकांना ताब्यात घेतले

खराडी पोलिसांनी सांगितले की, खराडी येथील एका व्यावसायिक संकुलातून कार्यरत असलेल्या रिक्रूटमेंट कंपनीने जून 2025 ते मे 2025 या कालावधीत 43.62 लाख रुपयांची...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

पुणे विभागातील बेकायदेशीर लिंग निर्धारण, भ्रूणहत्या रॅकेटमध्ये 15 वैद्यकीय व्यवसायी पोलिसांच्या स्कॅनरखाली

या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत बारावीत शिकणाऱ्या आणि एका वैद्यकीय व्यावसायिकाला अटक केली आहे पुणे : पोलिसांनी पुणे, सोलापूर, सातारा आणि अहिल्यानगर येथील 15...

4-5 मिनिटे वाचवण्यासाठी, एक प्रस्तावित रस्ता धोकादायक वेताळ टेकडी

पुणे: पुणे महानगरपालिकेने अर्ध्या दशकाहून अधिक काळ प्रस्तावित बालभारती-पौड फाटा रस्त्याला कोंडीत सापडलेल्या शहरी वाहतूक व्यवस्थेचा अडथळा दूर करण्यासाठी एक महत्त्वाचा हरवलेला दुवा मानला...

पीएमसी संचलित वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्याच्या छळाच्या आरोपावरून चौकशीचे आदेश

पीएमसी संचालित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (बीएव्हीएमसी) पुणे : पीएमसी संचालित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (बीएव्हीएमसी) च्या किमान चार महिला कर्मचाऱ्यांनी...

error: Content is protected !!