कोल्हापूर जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत ग्रीष्या मानेचे रौप्यपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण
फलटण, प्रतिनिधी : क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाची नवी उंची गाठणाऱ्या ग्रीष्या मिलिंद माने हिने कोल्हापूर जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकाविले आहे. या उल्लेखनीय यशामुळे तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रायफल शूटिंगसारख्या अत्यंत एकाग्रता, संयम आणि अचूकतेची आवश्यकता असलेल्या क्रीडा प्रकारात ग्रीष्याने केलेली ही कामगिरी कौतुकास्पद मानली जात आहे. कठोर सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांच्या पाठबळाच्या बळावर तिने जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध केले आहे.
ग्रीष्या माने हिच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळाली आहे. तिच्या मेहनतीला, जिद्दीला आणि उत्कृष्ट कामगिरीला मिळालेल्या या यशाचा सर्वांना मनापासून अभिमान वाटत आहे.
आता विभागीय स्पर्धेतही ग्रीष्या अशीच नेत्रदीपक कामगिरी करत आणखी यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत असून, भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरही ती आपल्या कौशल्याचा ठसा उमटवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रीष्या मिलिंद माने हिला विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा! अशीच दमदार कामगिरी करत यशाची नवी शिखरे सर करावीत, हीच सदिच्छा.


























