क्रिडा व युवक संचालनालय पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बीबी ता. फलटण येथे तालुका स्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या.
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण
या स्पर्धेमध्ये श्री जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज राजाळे या विद्यालयातील विद्यार्थी सोहम विजय शिनगारे व रुद्र किरण सिंह निंबाळकर यांनी प्रंथम क्रमांक मिळविला.
तसेच तालुकास्तरीय फ्री स्टाइल्स कुस्ती स्पर्धेमध्ये
ब्रह्मानंद सचिन निंबाळकर
शंभूराज दत्तात्रय गोफणे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला

श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या अध्यक्षा श्रीमती सविता (काकी )सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे मानद सचिव मा. श्री. डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. श्री .महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी( बेडके), नियामक मंडळाच्या सदस्या मा.सौ. ज्योतीताई सचिन सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सर्व सदस्य, प्रशालेचे प्राचार्य श्री.जाधव सर, पर्यवेक्षिका श्रीमती काकडे मॅडम, तसेच सर्व शिक्षक –शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.


























