Homeताज्या बातम्या'चिंचणी' ची वाटचाल शाश्वत पर्यटनाकडे- निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

‘चिंचणी’ ची वाटचाल शाश्वत पर्यटनाकडे- निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

सातारा – चिंचणी हे सातारा जिल्ह्यातून पंढरपूर येथे विस्थापित झालेले गाव आहे. या गावाने केलेले काम महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचले असून ते आता देशपातळीवरील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या अनुषंगाने वाटचाल करत आहे. ही वाटचाल खऱ्या अर्थाने शाश्वत पर्यटनाकडे घेऊन जाणारी असल्याचे मत निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी व्यक्त केले.

सोलापूर सोशल फाउंडेशन व चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव साजरा होत आहे. या अनुषंगाने सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे ,पोलीस उपनिरीक्षक सुशील कदम, राकेश साळुंखे, विलास बाबा, जवळ बापू जवळ उद्योजक, विजय शेलार, शरद सावंत, मच्छिंद्र गोगावले, आदी मान्यवर उपस्थित होते.

या पर्यटन सप्ताह मध्ये चिंचणी येथे 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या सहा दिवसांमध्ये वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतीक उपक्रम घेण्यात आलेले आहेत. याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सातारा विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमामध्ये प्रशासनातील अधिकाऱ्यांसह सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी यावेळी केले

यावेळी डॉ. अविनाश पोळ म्हणाले चिंचणीकरांनी सातारा जिल्ह्याचे सत्व जोपासत सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन रडत न बसता अडचणी व भौगोलिक परिस्थितीवर मात करत रचनात्मक काम उभे केले असून या नाविण्यपूर्ण प्रकल्पाला बळ देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्वजण या पर्यटन सप्ताह मध्ये सहभागी होऊयात.

यावेळी मोहन अनपट यांनी प्रास्ताविक केले व शशिकांत सावंत यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून आरोपी चौधरीने लोहगड किल्ल्यावर रियाल्टरला ढकलून दिले.

पुणे : अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यासोबत रचलेल्या योजनेनुसार 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन...

पावसामुळे वीज खंडित आणि चढ-उतार होतात

पावसामुळे शहरातील अनेक भागात अधूनमधून वीजपुरवठा खंडित झाला पुणे : बुधवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंढव्यात सुमारे चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित...

‘या मुलीला कधीच पाहिले नाही’: चेतनच्या वडिलांनी नकार दिला मुलाने केतन अग्रवालला लोहगडच्या कड्यावरून...

लोहगड किल्ल्यावरील पूर्वनियोजित हत्येतील आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाचा बचाव केला आणि दावा केला की तो एक जवळचा माणूस होता आणि व्यावसायिकाच्या जीवघेण्या पडझडीत...

2,000 कॉल्स, कॅफे मीट, किल्ल्याचा कट: पुण्यातील रिअल्टरच्या हत्येपूर्वी सिया गोयलला ‘स्वतःसाठी अधिक वेळ’...

केतन अग्रवाल हत्येचा कट पुणे पोलिसांनी उघड केला आहे पुणे: 2,000 हून अधिक फोन कॉल्स, कथितपणे दिवाळीच्या पार्टीत सुरू झालेली मैत्री आणि एका...

error: Content is protected !!