Homeताज्या बातम्याजिल्ह्यात क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचा निर्णय

जिल्ह्यात क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचा निर्णय

पुणे, दि. २९ : जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे घनकचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून स्थानिक स्तरावर त्याचे व्यवस्थापन करणे कठीण होत आहे. गावस्तरावर प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक जागा उपलब्ध न झाल्याने, एकत्रित क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या अनुषंगाने आज महात्मा गांधी सभागृह, जिल्हा परिषद पुणे येथे बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस श्री. चंद्रकांत वाघमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती शालिनी कडू प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), श्री. व्यंकटेश दुर्वास सहआयुक्त नगरपालिका शाखा, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, श्री. अनिल दौंडे उपविभागीय अधिकारी, खेड, श्री. नितीन गवळी प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी चाकण, श्री. भूषण जोशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. अप्पासाहेब गुजर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी-स्वच्छता विभाग, श्री. विशाल शिंदे गटविकास अधिकारी, पंचायत समिती खेड, श्री. अंकुश जाधव मुख्याधिकारी नगरपालिका चाकण, श्री. भांडगे कार्यकारी अभियंता, एमआयडीसी चाकण तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत चाकण नगरपालिका व एमआयडीसी लगतच्या ग्रामपंचायती म्हणजे कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कुरळी-खराबवाडी, खालुम्ब्रे, म्हाळुंगे, निगोजे, मोई तसेच आंबेठाण या गावांचा क्लस्टरमध्ये समावेश करण्यात आला आहे.

बैठकी दरम्यान प्रकल्पासाठी जागा उपलब्धता, अपेक्षित खर्च तसेच गावनिहाय निर्माण होणारा दररोजचा घनकचरा याबाबत माहिती सादर करण्यात आली. त्यानंतर सर्व संबंधित ग्रामपंचायतींच्या एकत्रित सहभागातून क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी पुढील कार्यवाहीचे सविस्तर नियोजन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रहिवाशांच्या विरोधानंतर पीसीएमसी स्थायी समितीने पुनावळे शाळेचा जमीन भाडेपट्टा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवला

पुणे : रहिवाशांच्या तीव्र विरोधाला तोंड देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी पुनावळे येथील शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेला भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा...

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले : रोहित पवार

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याने बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोके वर काढत असल्याचा दावा...

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

error: Content is protected !!