सुभाष पटनाईक| दिल्ली | मुंबई,ठाणे उपनगर डोंबिवली,कल्याण येथील उच्च शिक्षित,प्राध्यापक,डॉक्टर,
वकील,पत्रकार,समाज सेवक,महिला समाज सेविका व व्यावसायिक या दिग्गज मान्यवरांचा नवी दिल्ली आणि फरीदाबाद येथे विशेष पुरस्कार स्वर्ण भारत,आंतर राष्ट्रीय पुरस्कार,डॉक्टरेट,सेवारत्न,नारीशक्ती दिग्गज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून,त्यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले.
‘इंडिया प्राउड बुक ऑफ रेकॉर्ड’ या संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून, १७ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली,शास्त्रीनगर एपीव्ही स्टुडिओ येथे प्राध्यापक गंगाधर तात्याबा आगवणे,ज्येष्ठ पत्रकार सुभाष पटनाईक,मुंबईच्या व्यावसायिक ज्योती राव आणि ठाण्याच्या समाज सेविका छाया गचके-जोशी या दिग्गज मान्यवरांचा कपिल शाहू,लखनऊ येथील सुप्रसिद्ध गायिका जानव्हि पांडे व इतर दिग्गज मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह,प्रमाणपत्र सुपूर्द करून, पुरस्कार प्रदान आला.
१८ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या फरीदाबाद येथे ‘मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड’ अँड आर्ट युनिव्हर्सिटी या उच्च राष्ट्रीय संस्थेच्या अंतर्गत विशेष अवॉर्ड, आंतरराष्ट्रीय आयकॉन पुरस्कार, डॉक्टरेट पुरस्कार,सेवा रत्न पुरस्कार,नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य येथील मुंबई,ठाणे,डोंबिवली,कल्याण येथील मान्यवर आणि विविध राज्यातून आलेल्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा दिग्गज मान्यवर कुलगुरू डॉ.चंद्रपाल यादव,डॉ.राकेश नारायण आचार्य,भागवत आचार्य(वृंदावन) डॉ.राजसिंग झिंजार (निवृत्त प्राध्यापक हरियाणा महाविद्यालय.) मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेच्या विश्वस्त सुश्मिता यादव,यांच्या हस्ते स्मृती चिन्ह,प्रमाणपत्र सुपूर्द करून, मुंबई किर्ती महाविद्यालयाचे तत्वज्ञान विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक गंगाधर तात्याबा आगवणे यांना आंतर राष्ट्रीय आयकॉन विशेष पुरस्कार सामाजिक कार्याबद्दल सेवा रत्न पुरस्कार स्मृती चिन्ह,प्रमाण पत्र सुपूर्द करून,विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका श्रीष्टी यादव यांनी करून,आपल्या मधुर वाणीने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

























