Homeताज्या बातम्यापत्रकार व साहित्यिक हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात - रविंद्र ...

पत्रकार व साहित्यिक हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात – रविंद्र बेडकीहाळ

फलटण : भारतीय पत्रकार संघ (AIJ) परिसंवाद, पदग्रहण व सत्कार समारंभ असे संयुक्त कार्यक्रमाचे नवलबाई कार्यालय फलटण येथे आयोजन करण्यात आले होते या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन, माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीसिंह भोसले श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव, सचिन सूर्यवंशी (बेडके), प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रसाद जोशी, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ, जेष्ठ नेते डि.के पवार, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एम एस शेख, पश्चिम महा. अध्यक्ष रमेश मामा गणगे, सातारा जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव, पुणे जिल्हाध्यक्ष तैनूर शेख, सांगली जिल्हा संघटक अनंत सुतार यांच्या प्रमुख उपस्थिती मोठ्या उत्साहात पार पडला.

तरुण व युवा पत्रकारांनी शोध पत्रकारितेत काम करावे व अनुभव घ्यावा, पत्रकारितेत दिसत असले चित्र व त्यामागचे सत्य शोधण्याची गरज असते, पत्रकारिता हा देशाचा चौथा स्तंभ आहे त्यामुळे पत्रकार हा अनुभवी, अभ्यासू व दूरदृष्टी असलेला पाहिजे, असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

माझी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी रवींद्र बेडकीहाळ हे ज्येष्ठ पत्रकार असून अनेक वर्ष त्यांचे पत्रकारितेत काम आहे. त्यांनी ’दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर स्मारक साठी केलेल्या कामाचे कौतुक केले व त्यांना दीर्घायुष्य लाभो असे शुभेच्छा दिल्या.

यावेळी जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांनी दर्पण कर पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर त्रिखंडात्मक ग्रंथ लिहिलेले आहेत. याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले पत्रकार व साहित्यिक हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात समाजामध्ये यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे पत्रकार व साहित्यिक यांच्या विकासाकरिता शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत असे मत कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार श्री रवींद्र बेडकीहाळ यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांनी पत्रकारिता हे लोकहित व जनजागृतीचे कार्य आहे. हे कार्य करत असताना पत्रकारांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. पत्रकारांच्या कल्याणा करिता काम करत असताना भारतीय पत्रकार संघाच्या वतीने या देशातल्या अनेक वैद्यकीय व शैक्षणिक संस्थां सोबत असलेले करार येत्या काळामध्ये पत्रकारांच्या हिताचे ठरत आहेत. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा पत्रकार विकास शिंदे व आभार प्रदर्शन संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘बस आज की रात है जिंदगी’: केतन अग्रवालने कौटुंबिक कार्यक्रमात नाचलेले गाणे आता एक...

7 मे रोजी कार्यक्रमात सादर झालेल्या गायिका रीतू शर्माने कार्यक्रमातील आनंदी वातावरणावर प्रकाश टाकणारा एक मार्मिक व्हिडिओ शेअर केला आहे. पुणे: एकेकाळी कौटुंबिक...

लोहगड किल्ला खून: पोलिसांनी गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले, चेतनच्या चालीचे विश्लेषण; केतन अग्रवालच्या...

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी आरोपी चेतन चौधरी याला लोहगड किल्ल्यावर आणले आणि केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासाचा एक भाग म्हणून चेतनच्या गुन्ह्याच्या...

*संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा* *रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप...

संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप शिंदे खजिनदार; लायन्स क्लब फलटणची नवी कार्यकारिणी पदस्थ   फलटण, प्रतिनिधी : समर्थ...

नाल्यांमध्ये अडकलेल्या गौरची वन पथकाने सुटका केली

गौर आपल्या कळपापासून विभक्त होऊन शहरी किनाऱ्याजवळ राहिली असावी. अन्न किंवा पाण्याच्या शोधात ते शहरात दाखल झाले असावे पुणे : सिंहगड रोडवरील विश्रांतीनगर...

किरकोळ टेम्पोसह चार वाहनांना धडक, बुक

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर वैदूवाडी येथे मंगळवारी सायंकाळी एका १७ वर्षीय मुलाने पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी चालवत असलेल्या टेम्पोने चार वाहनांना धडक दिली.वानवरी...

error: Content is protected !!