*पाडेगावातून सोमेश्वर कारखान्यासाठी सर्वाधिक मतदान मिळवून देणार!*
*आमदार सचिन कांबळे-पाटील यांचा निर्धार; पाडेगावात प्रचार बैठका*
पाडेगाव, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर **‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’**च्या प्रचाराला फलटण तालुक्यात वेग आला आहे. या अनुषंगाने पाडेगाव येथील नेवसे वस्ती, पाडेगाव गावठाण तसेच मीरेवाडी येथे सभासदांच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी “पाडेगावातून सोमेश्वर कारखान्यासाठी सर्वाधिक मतदान मिळवून देणार,” असा निर्धार आमदार सचिन कांबळे-पाटील यांनी व्यक्त केला.

पाडेगाव परिसरातील सभासदांशी संवाद साधताना आमदार कांबळे-पाटील यांनी कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर चर्चा केली. गावागावातील सभासदांशी थेट संपर्क साधत पॅनेलच्या प्रचाराला गती देण्यावर यावेळी भर देण्यात आला.

या बैठकीस माळेगाव कारखान्याचे संचालक योगेशभैया जगताप, विजय कदम, शैलेशनाना रासकर, अशोकराव धायगुडे, रामदास नेवसे, सूर्यकांत खरात, अमोल खराडे, शेखर खरात, विकास लोखंडे, प्रमोद येळे यांच्यासह अन्य मान्यवर तसेच सोमेश्वर कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत गावनिहाय सभासदांचे मतदान महत्त्वाचे ठरणार असल्याने पाडेगाव परिसरातील सभासदांशी झालेल्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आमदार सचिन कांबळे-पाटील यांनी पाडेगावातून सर्वाधिक मतदान मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केल्याने पाडेगावच्या मतदानाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


























