Homeताज्या बातम्याप्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

“पर्यावरण वाचलं नाही तर आपणही वाचणार नाही” – प्रा. सुधीर इंगळे

फलटण, कोळकी (दि.१५) : सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कोळकी येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रा. सुधीर इंगळे (माजी प्राचार्य, मुधोजी महाविद्यालय, फलटण) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी “पर्यावरण वाचलं नाही तर आपणही वाचणार नाही” असे सांगत विद्यार्थ्यांना स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.

कार्यक्रमाला तालुका क्रीडा अधिकारी व राष्ट्रीय हॉकी कोच प्रा. महेश खुटाळे, सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप माने, कोषाध्यक्षा सौ. सविता माने, योग प्रशिक्षक सौ. विद्या शिंदे, पत्रकार श्री. योगेश फडतरे (सकाळ), श्री. सतिश कर्वे (लोकमत), श्री. मुकेश नाळे, संचालिका सौ. संध्या गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, प्रथमेश गायकवाड, प्राचार्या सौ. सुजाता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्या सौ. सुजाता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर इयत्ता १० वी च्या विद्यार्थिनी मेहरुज शेख हिने स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व उलगडले. माध्यमिक विभागाने “भारत हमको जान से प्यारा है” तर प्राथमिक विभागाने “बलसागर भारत होवो” हे गीत सादर केले. पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विद्यार्थ्यांनी सामाजिक जागरूकतेवरील नाटिका सादर करून स्वच्छतेचा व ऐक्याचा संदेश दिला. इ. ६वी-७वी च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले, तर लहान चिमुकल्यांनी स्वतंत्रवीरांची माहिती सांगून सर्वांना भावूक केले.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील नर्सरी ते १२ वी सर्वोत्तम विद्यार्थी तसेच इ. १० वी व १२ वी मध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तालुका क्रीडा अधिकारी प्रा. महेश खुटाळे यांनी विद्यार्थ्यांना हॉकी स्टिक व बॉल भेट दिले. संस्थेच्या वतीने NIE सकाळ वृत्तपत्राचा उपक्रम सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जागृती गुप्ता व सौ. सँडिन्या घाडगे यांनी केले. शेवटी देशभक्तीच्या घोषणा आणि आनंदी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR | पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रियेला गती देण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात | पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...

error: Content is protected !!