Homeताज्या बातम्याफलटण पंचायत समिती , शिक्षण विभाग व सरस्वती शिक्षण संस्था संचलित...

फलटण पंचायत समिती , शिक्षण विभाग व सरस्वती शिक्षण संस्था संचलित , प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ५३वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि .४ ते ६ डिसेंबर दरम्यान

फलटण दि.२५| प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड जुनिअर कॉलेज , कोळकी फलटण येथे  ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभाग ,फलटण व सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी फलटण यांचेकडून देण्यात आली.

फलटण तालुक्यातील सर्व माध्यम आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी या विज्ञान प्रदर्शनात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन फलटण शिक्षण विभागाने केले आहे. विज्ञान प्रदर्शन हे ४ डिसेंबर २०२५ ते ६ डिसेंबर २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत होणार असून विद्यार्थी, शिक्षक व परिचर यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी ठरवलेले प्रमुख विषय

१) शाश्वत शेती

२) कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकला पर्याय

३) हरित ऊर्जा

४) उदयोन्मुख तंत्रज्ञान

५) मनोरंजक गणितीय मॉडेलिंग

६) आरोग्य आणि स्वच्छता

७) जल संवर्धन व व्यवस्थापन

या विषयांवर आधारित इयत्ता ६ वी ते ८ वी (उच्च प्राथमिक) तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी (माध्यमिक व उच्च माध्यमिक) विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके, मॉडेल्स व वैज्ञानिक प्रकल्प अपेक्षित आहेत. तसेच विद्यार्थ्यांना ‘तंत्रज्ञान आणि खेळण्यांमधील नवकल्पना’ या श्रेणीमध्येही स्वतंत्रपणे मॉडेल्स सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद शाळांसाठी एक (६ वी ते ८ वी) आणि प्रत्येक माध्यमिक शाळेस दोन उपकरणांची मांडणी अनिवार्य असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपले मॉडेल्स वेळेत सादर करावेत, असेही कळवण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक

४ डिसेंबर २०२५ : नोंदणी, मॉडेल मांडणी व उद्घाटन

५ डिसेंबर २०२५ : प्रश्नमंजुषा स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा

६ डिसेंबर २०२५ : पारितोषिक वितरण व समारोप

फलटण तालुक्यातील नवोदित वैज्ञानिक प्रतिभेला दिशा देणारे हे प्रदर्शन उत्साहात पार पडणार असून, विविध शाळांकडून मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे फलटण पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री.मठपती साहेब यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

SIR प्रगणना फॉर्म ऑनलाइन सबमिट करण्यासाठी अचूक आधार-EPIC डेटा जुळणे अनिवार्य, अधिकारी म्हणतात |...

शनिवारी खडकी येथे एसआयआर मोहिमेदरम्यान मतदारांनी फॉर्म भरले आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली पुणे : विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) 2026 प्रगणना फॉर्म सबमिट...

सिया गोयलचे वडील म्हणतात की व्हायरल ‘मिडल फिंगर’ क्षण कारच्या दरवाजाच्या अपघातामुळे झाला

पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलीस कोठडीत असताना आपल्या मुलीने अश्लील हावभाव केल्याचा आरोप सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांनी शनिवारी...

‘लग्न जे कधीच होणार नाही’: सिया गोयलचा मित्राला ‘स्नॅपचॅट मेसेज’ व्हायरल झाला

सिया गोयलचा समावेश असलेल्या स्नॅपचॅट संभाषणाचा कथित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी तिला न्यायालयीन कोठडीत...

‘लग्नाचे 4 महिन्यांचे नियोजन’: सिया गोयलचा मंगेतर केतन अग्रवालचा जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांचा मृत्यूच्या काही दिवस आधी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पुन्हा ऑनलाइन व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल, त्याच्या...

*राष्ट्रीय पिंच्याक सिलट स्पर्धेत योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश*

*राष्ट्रीय पिंच्याक सिलट स्पर्धेत योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश*   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क   नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या योद्धा...

error: Content is protected !!