पुणे भोर दि.१७ | शंकरराव भेलके महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे पुस्तक हंडी हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयामध्ये पुस्तक हंडीचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी साहसी क्रीडा प्रकारात सहभागी झाले पाहिजे. पारंपरिक सण साजरे करत असतानाच पुस्तकांशी मैत्री करून स्वतःला समृद्ध केलं पाहिजे हाच हेतू या कार्यक्रमाचा होता, असे मत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विद्यार्थी तसेच विद्यार्थीनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने विद्यार्थांना पुस्तके वाटण्यात आली. विठ्ठल कोळपे, विजय बाटे, आयान मुलानी, हर्षद डिंबळे, निशांत मोरे, प्रणय ओंबळेया विद्यार्थ्यांनी पुस्तकहंडीस सलामी देत कार्यक्रमाची सुरुवात केली. निकिता कोंढाळकर, निशा दीक्षित, पौर्णिमा गोळे, पोर्णिमा कांबळे, नेहा वाल्हेकर, तृप्ती सणस, निकिता माने, सायली गाडे, शुभांगी कोंडे, आदिती गोळे, प्रज्ञा गायकवाड, रिया नाईक, मानसी खोपडे, आरती मिरकुटे, प्रियांका कोकरे या विद्यार्थिनीनी पुस्तक हंडी फोडून कार्यक्रमाची सांगता केली. विजयी संघाला स्पर्धा परीक्षा आणि अभ्यासपूरक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा. संदीप लांडगे आणि सर्व सदस्यांनी प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. जगदीश शेवते, प्रा. सहदेव रोडे, डॉ. रोहिदास ढाकणे, प्रा. पौर्णिमा काराळे, प्रा. भगवान गावित, डॉ. सचिन घाडगे, प्रा.जीवन गायकवाड, प्रा.भूषण समगीर , प्रा. वैष्णवी कोंडे, प्रा. ऐश्वर्या धुमाळ, प्रा. अंकिता महांगरे, प्रा.जाधवर डी.एस., प्रा. महेश कोळपे, प्रा.माऊली कोंडे, डॉ. गणपत आवटे प्राध्यापकेतर कर्मचारी सुमित कांबळे, अभिषेक मोरे, सीमा देशमुख तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.























