Homeताज्या बातम्यामाहिती मागण्याची गरज पडू नये अशी पारदर्शी व्यवस्था निर्माण व्हावी- ॲड. प्रल्हाद...

माहिती मागण्याची गरज पडू नये अशी पारदर्शी व्यवस्था निर्माण व्हावी- ॲड. प्रल्हाद कचरे

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यशाळेचे विधानभवन येथे आयोजन

पुणे, दि. २९ : शासकीय विभागांनी अधिकाधिक माहिती सार्वजनिकरित्या पाहण्यासाठी व्यवस्थेत (पब्लिक डोमेन) उपलब्ध करुन दिल्यास माहितीचा अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल. माहितीचा अधिकार कायद्याखाली माहिती मागण्याची गरजच पडू नये अशी पारदर्शी, गतीशील व्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा निवृत्त अपर जिल्हाधिकारी ॲड. प्रल्हाद कचरे यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन २८ सप्टेंबरच्या निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालय आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विधानभवन येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी सामान्य प्रशासन अपर आयुक्त तुषार ठोंबरे, सह आयुक्त अरुण आनंदकर, संजीव पलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.

या वर्षाची आंतरराष्रीी य माहिती अधिकार दिनाची संकल्पना ‘डिजिटल युगात पर्यावरणीय माहितीची उपलब्धता निश्चित करणे’ अर्थात ‘इनशुअरिंग ॲक्सेस टू एन्व्हायर्नमेंटल इन्फर्मेशन इन द डिजिटल एज’ अशी असल्याचे सांगून पर्यावरणीय माहितीसाठा, वातावरणीय बदल, प्रदुषण, आपत्ती धोके आदींच्या अनुषंगाने माहितीची सुलभ उपलब्धता आदी या संकल्पनेमागील बाबी असल्याचे ॲड. कचरे यांनी सांगितले.

डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण अधिनियम, २०२३ च्या अनुषंगानेही संक्षिप्त माहिती देण्यात आली. माहितीचा अधिकार अधिनियम, लोकसेवा हक्क अधिनियम, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५, तसेच सार्वजनिक अभिलेख अधिनियम, १९९७ हे कायदे शासकीय सेवा बजावत असताना खूप महत्त्वाचे असून नागरिकांना माहिती, सेवा पुरवताना ती वेळेत कशी मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासन हे जनतेला उत्तरदायी असावे या दृष्टीने या कायद्याची निर्मिती झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

अभिलेखांचे डिजिटायझेशन करण्यात महाराष्ट्राचा महसूल विभाग देशात आघाडीवर असल्याने महसूलविषयक माहितीची सुलभ उपलब्धता होत असल्याचेही ॲड. कचरे यांनी सांगितले.

माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजवणीच्या अनुषंगाने विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

कार्यशाळेला विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रहिवाशांच्या विरोधानंतर पीसीएमसी स्थायी समितीने पुनावळे शाळेचा जमीन भाडेपट्टा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवला

पुणे : रहिवाशांच्या तीव्र विरोधाला तोंड देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी पुनावळे येथील शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेला भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा...

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले : रोहित पवार

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याने बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोके वर काढत असल्याचा दावा...

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

error: Content is protected !!