फलटण तालुक्यातील निरगुडी या गावात अनेक अशी दिलदार, मनमिळाऊ स्वभावाचे अशी व्यक्तिमत्व आहेत. त्याच भूमीतून समाजहिताची ओढ मनात ठेवून कार्य करणारे नाव म्हणजे शांताई उद्योग समूहाचे संस्थापक व युवा नेते श्री. गणेश (दादा) सस्ते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
गणेश सस्ते यांनी अल्पावधीतच आपल्या परिश्रम, दृष्टीकोन आणि सामाजिक जाणिवेच्या बळावर सस्ते व्हेजिटेबल व शांताई उद्योग समूह उभारून परिसरातील शेतकरी, महिला व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. समाजातील प्रत्येक घटकाला हात देत त्यांनी रोजगार निर्मिती आणि सामाजिक बांधिलकी या दोन्ही अंगांना जोडून दाखवले आहे.
त्यांचे कार्य फक्त उद्योगापर्यंत मर्यादित नसून सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. गोरगरीब, सर्व जाती-धर्मातील लोकांशी आपुलकीने वागणे, कोणाच्याही मदतीसाठी तत्पर धावुन जाणे, हेच त्यांचे व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेवर चालणारे गणेश सस्ते हे समाज परिवर्तनाची प्रेरणा देणारे तरुण नेतृत्व आहेत.
त्यांचा स्वभाव मनमोकळा, जिद्द अपार आणि दृष्टिकोन सकारात्मक आहे. म्हणूनच निरगुडी गावासह संपूर्ण परिसरात ते दादा, तात्या” म्हणून ओळखले जातात.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व समाजघटक, मित्रपरिवार यांच्याकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!! आपले कार्य असेच प्रेरणादायी राहो, आणि आगामी वर्ष अधिक यशस्वी जावो. हिच सदिच्छा.व वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..!


























