Homeताज्या बातम्याराजे गटाने फलटणच्या सहकाराची राखरांगोळी केली’ दूध संघाच्या स्थितीवरून माजी खासदार रणजितसिंह...

राजे गटाने फलटणच्या सहकाराची राखरांगोळी केली’ दूध संघाच्या स्थितीवरून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आरोप; ‘जमीन न विकता दूध संघ चालवून दाखवू’

‘राजे गटाने फलटणच्या सहकाराची राखरांगोळी केली’

दूध संघाच्या स्थितीवरून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आरोप; ‘जमीन न विकता दूध संघ चालवून दाखवू’

फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

फलटण तालुका सहकारी दूध संघाच्या सद्यस्थितीवरून राजे गटावर टीका करताना, “ज्येष्ठ नेते स्वर्गीय सुभाषराव शिंदे यांच्या काळात दूध संघाचे तब्बल १ लाख १० हजार लिटर दूध संकलन होत होते. राजे गटाने संघ ताब्यात घेतल्यानंतर दूध संकलन कमी होत गेले आणि खासगी दूध संघांचे संकलन वाढत गेले. फलटण तालुका दूध संघाचे ऐश्वर्य राजे गटाने धुळीस मिळविले,” असा आरोप माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.

फलटण येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निंबाळकर म्हणाले, “राजे गटाला खासगी दूध संघ चालविता येतात, मग सहकारी दूध संघ अडचणीत कसा आला? सध्या दूध संघाचा लिलाव निघाला असून तो अवसानात निघाला आहे. तीन वर्षांपूर्वी संघावर अडीच कोटी रुपयांचे कर्ज असताना आम्ही संघाची जमीन न विकता दूध संघ चालवू, असे निवेदन दिले होते.”

‘राजे गटाने सहकार संपवला’

“फलटण तालुक्यातील सहकार क्षेत्रातील संस्था एक-एक करून बंद पाडण्याचे काम झाले आहे. खरेदी-विक्री संघाचे गोडाऊन विकणे, श्रीराम कारखाना खासगी संस्थेला देऊन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणे आणि आता पुन्हा सभासदांकडून पैसे मागणे, असे प्रकार सुरू आहेत. एका बाजूला कारखान्यावर कर्ज नाही असे सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला कारखाना अडचणीत असल्याचे सांगायचे, अशी विसंगत भूमिका घेतली जात आहे,” असा आरोप निंबाळकर यांनी केला.

“खासगी कारखानदारामार्फत पैसे टाकून कारखाना बुडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आमचे म्हणणे आहे. आम्ही फलटण तालुक्याला नवी दिशा देण्यासाठी निघालो आहोत. यांनी खासगी दूध संघ चालविण्यासाठी सहकारी दूध संघाची राखरांगोळी केली,” असेही ते म्हणाले.

‘रामराजे माझ्यावर बोलायचे नाही म्हणतात; पण भाषण माझ्यावरच करतात’

“रामराजे नाईक निंबाळकर माझ्यावर बोलायचे नाही, असे म्हणतात; मात्र त्यांचे संपूर्ण भाषण माझ्यावरच असते. माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना जमत नाही,” अशी टीकाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.

‘सुभाषराव शिंदे यांच्या काळात सहकाराची भरभराट’

फलटण तालुका सहकारी दूध संघाचे माजी चेअरमन भीमदेव बुरुंगले यांनी दूध संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला.

“१९८५ च्या दरम्यान माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे आणि सहकारमहर्षी हनुमंतराव पवार यांच्या काळात फलटण तालुका सहकारी दूध संघ नावारूपाला आला. सुरुवातीला ६५ ते ७० हजार लिटर दूध संकलन होत होते. फलटण तालुक्यात शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाला चालना मिळाली. त्यानंतर स्वर्गीय सुभाषराव शिंदे चेअरमन झाले. त्यांच्या काळात दूध संघ चांगल्या प्रकारे चालला. तो काळ फलटणच्या सहकार क्षेत्रासाठी पर्वणीचा होता,” असे बुरुंगले म्हणाले.

“मी दूध संघाचा चेअरमन झालो, त्यावेळी दुधाची प्रत सुधारण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू होते. त्याच काळात खासगी दूध संघांची निर्मिती झाल्याने सहकारी दूध संघाला उतरती कळा लागली. दूध संघ राजे गटाच्या ताब्यात आल्यानंतर डी. के. पवार आणि मी संघासाठी कष्ट घेतले. आर्थिक अडचणीत असतानाही कोणत्याही परिस्थितीत न डगमगता संघ चालविला,” असे त्यांनी सांगितले.

‘चिलिंग मशीन घेतले, थकीत देणी दिली’

“दूध संघासाठी दीड लाख रुपयांना चिलिंग मशीन आणले. सर्व थकीत देणी दिली. त्यामुळे दूध उत्पादकांचा संघावर विश्वास निर्माण झाला. त्यावेळी ५६ हजार लिटर दूध संकलन होत होते. दूध संकलन वाढविण्यासाठी आम्हाला अॅडव्हान्स देण्याची वेळ आली. दूध संघ संपूर्ण कर्जमुक्त करून दीड कोटी रुपयांचा फायदा करून दिला. मात्र त्यानंतर मला संधी मिळाली नाही,” असा दावा बुरुंगले यांनी केला.

“राजे गटाकडून दूध संघ बंद पाडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. सध्या हा दूध संघ बंद आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

पत्रकार परिषदेस आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक सोमशेठ जाधव, सुदामआप्पा मांढरे, चेतन शिंदे, अमरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, रोहित नागटिळे, किरण राऊत, मीना काकडे, सुपर्णा अहिवळे, रुपाली सस्ते, जितेंद्र सरगर, मीनाक्षी हेंद्रे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव...

0
*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव च्या वेताळबाबा मंदिरात महाआरती चे नियोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण पासून...

error: Content is protected !!