लायन्स क्लब ऑफ फलटणतर्फे गांधी-शास्त्री जयंती उत्साहात
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण
फलटण, प्रतिनिधी : लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या जीवनकार्याचा, देशसेवेचा तसेच सत्य, अहिंसा, स्वच्छता, साधेपणा आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांचा उपस्थितांनी स्मरण केला.

महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसेच्या मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला दिशा दिली, तर लालबहादूर शास्त्री यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श देशासमोर ठेवला. त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ फलटणचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.


























