Homeताज्या बातम्यावंचितांचा आवाज कायमचा थांबला – सत्यशोधक बाबा आढाव यांना अखेरचा सलाम

वंचितांचा आवाज कायमचा थांबला – सत्यशोधक बाबा आढाव यांना अखेरचा सलाम

समाजातील अन्यायाविरुद्ध आयुष्यभर रणांगणात लढलेल्या, वंचित-श्रमिक आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या सत्यशोधक विचारांचे प्रवर्तक बाबा आढाव यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रातील परिवर्तनाची परंपरा हादरून गेली आहे. गरीब, मजूर, हमाल, उपेक्षित, पीडित आणि श्रमिकांच्या व्यथेशी एकरूप होऊन संघर्ष केलेल्या या महात्म्याचे जाणे म्हणजे समाजातील असंख्य कष्टकऱ्यांचा आधार हरपणे आहे.

असमानतेविरुद्ध अखंड संघर्ष – आपल्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा समाजातील दुर्लक्षित घटकांचे जीवन उंचावण्यासाठी आयुष्य वाहून घेण्याचा त्यांचा संकल्प जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत अविचल राहिला.

महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या सत्यशोधक परंपरेचे ते जिवंत प्रतिक होते.

श्रमिकांना हक्क मिळवून देणारे योद्धा कामगारांच्या वेदनेवर फक्त भाषणे नव्हे तर चळवळ उभारून उत्तर मिळवून देणे ही त्यांची जीवनशैली:

हमाल पंचायत चळवळ बाजारपेठांतील हमालांना ओळखपत्र, नोंदणी, न्याय्य वेतन, सुट्टी, सामाजिक सुरक्षा, निवृत्तीवेतन मिळवून देणारी ऐतिहासिक लढाई. मोफत बाजार संकल्पना दानाचा अहंकार नाही आणि गरिबीची लाज नाही, सन्मानपूर्वक गरजूंना वस्तू वितरणाची क्रांतिकारक कल्पना. असंगठित कामगारांना न्याय बांधकाम कामगार, घरकामगार महिला, ग्रामीण श्रमिक, कंत्राटी मजूर यांना शासनाच्या योजनांशी जोडणे, विमा व सामाजिक संरक्षण मिळवून देण्यासाठी आयुष्याचा थरारक संघर्ष.

त्यांची संघर्षशक्ती म्हणजे घोषणा नव्हे प्रत्यक्ष कृती.

तत्त्वांशी तडजोड नाही 

धार्मिक अंधश्रद्धा, वर्णव्यवस्था, जातिभेद आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी निर्भिड आवाज उठवला. “माणूस हा माणूस म्हणून समान” हे विचार त्यांनी व्यवहारात उतरणारा आंदोलनाचा मार्ग दाखवला.

साधेपणातून क्रांती – 

बाबांचे संपूर्ण आयुष्य विलासी झगमगाटापासून दूर राहिले. खाणे साधे, राहणी साधी पण स्वभाव तेजस्वी, विचार कणखर आणि न्यायासाठी तडफदार.

त्यांचा देह शांत झाला, पण संघर्षांची मशाल हातात घेत उभे राहणाऱ्या पुढील पिढ्यांना त्यांचे कार्य प्रेरणा देत राहील. बाबा आढाव यांनी दाखवलेला मार्ग एकच होता तो म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा, वंचितांसोबत खंबीरपणे उभे राहायचे आणि समाज परिवर्तन तडफदार कृतीतून घडवायचे. महान कार्याची परंपरा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली.

— आयु. सोमीनाथ घोरपडे सामाजिक कार्यकर्ता • ज्येष्ठ प्रवचनकार भारतीय बौद्ध महासभा, फलटण

7387145407

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार मुळशी धरणाच्या पाण्याचा शहरासाठी वापर करणार, मंत्री म्हणतात या आठवड्यात बैठक

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाचे बॅकवॉटर पुणे : मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी मिळावे, असा प्रलंबित प्रस्ताव दौंडचे भाजप आमदार राहुल कूल यांनी बुधवारी...

पुणे-मुंबई घाट विभागात भूस्खलनाने प्रभावित झालेल्या तीनपैकी एक रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला

पुणे: ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल दरम्यानच्या भूस्खलनग्रस्त विभागातील तीन रेल्वे मार्गांपैकी एक मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री साफ केल्याने पुणे-मुंबई दरम्यानच्या...

पुण्यात मुसळधार पावसात इमारत कोसळून १६ जण अडकल्याची भीती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी (WTE) प्लांटमधील मोशी येथील तीन मजली प्रशासकीय इमारत बुधवारी मुसळधार पावसात कोसळलीImage Credit: TNN पुणे : पिंपरी चिंचवड...

*श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सन्मान**

*श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सन्मान* फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत निर्मला देवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण या शाळेतील विद्यार्थी *अर्णव...

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी घेतली भाजप नेते विनोद तावडे यांची भेट

जयंत पाटील (एल) आणि विनोद तावडे (नि.) यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएमध्ये सामील होण्याच्या अटकळांना तोंड फुटले. पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष...

error: Content is protected !!