Homeताज्या बातम्या*वारकऱ्यांच्या सेवेसाठी समर्थ प्रतिष्ठानचा सेवाभावी उपक्रम; अल्पोपहार व मोफत आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त...

*वारकऱ्यांच्या सेवेसाठी समर्थ प्रतिष्ठानचा सेवाभावी उपक्रम; अल्पोपहार व मोफत आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद*

वारकऱ्यांच्या सेवेसाठी समर्थ प्रतिष्ठानचा सेवाभावी उपक्रम; अल्पोपहार व मोफत आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क | फलटण

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या परतीच्या वारीनिमित्त समर्थ प्रतिष्ठान, फलटण यांच्या वतीने शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सरकारी दवाखान्यापाशी, बारामती चौक, फलटण येथे वारकरी बांधवांसाठी सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला वारकरी, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रसंगी वारकरी बांधवांना वडापाव, कॉफी व बिस्किटांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच सरकारी दवाखान्याच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सेवांमुळे वारीतील भाविकांना मोठा दिलासा मिळाला. समर्थ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध नियोजन करून वारकऱ्यांची सेवा केली.

कार्यक्रमाचे उद्घाटन फलटण नगर परिषदेचे नगर अध्यक्ष समशेरसिह नाईक निंबाळकर राष्ट्रपती पारितोषिक विजेता कीर्तनकार ह.भ.प. नम्रता कर्वे महाराज, हनणमंत अण्णा सरक (महाराज) , ओरियन बँकेचे चेअरमन व फलटण , पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, कॉन्स्टेबल महेश जगदाळे, कॉन्स्टेबल नाना होले, लोकमतचे तालुका प्रतिनिधी व भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विकास शिंदे, शेखर करचे, कैलास सोडमिशे, अमित साळुंखे, रमण भोईटे, सनी भोईटे, युवा उद्योजक पप्पू सोडमिशे, माऊली चव्हाण, आनंद कांबळे, ओमकार अलगुडे, देवराज शेंडे, रवी सुतार, मधुकर बनकर, बबन बनकर, सूर्याजी जगताप, बाळासाहेब जाधव (बाळशास्त्री जांभेकर विद्यालय), मुख्याध्यापक अरुण खरात

ज्येष्ठ पत्रकार अशोक सस्ते (सकाळ तालुका प्रतिनिधी), विवेक लाटे (सकाळ – जाहिरात विभाग), मनोज पवार (सकाळ तालुका प्रतिनिधी), दीपक मदने (सकाळ तालुका प्रतिनिधी), राजेंद्र बोंद्रे (सातारा न्यूज कार्यकारी संपादक), वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लीला मदने, डॉक्टर . पाटील मॅडम, डॉक्टर राठोड, डॉक्टर शहा, डॉक्टर तारळकर, इन्चार्ज सिस्टर लंबाते मॅडम, सिस्टर शेडगे, मेहेत्रे सिस्टर , गोरे सिस्टर, मंगल तांबे सिस्टर, ज्योती बोंडे सिस्टर, शंकर पवार, मयूर चव्हाण, अशोक मगर, मंदार किकले ,दिनेश दयारामनी, जुबेर कोतवाल, अमित अहिवळे, सिद्धेश घोडके, (रील स्टार) शत्रुघ्न अहिवळे, आदित्य शेंडे, संगीता शेंडे, मंथन जाधव, दीपक नलवडे, संतोष बोबडे, संतोष दगडे, अशोक जाधव, अक्षय जगताप, सागर होले, अनिल करचे,( फलटण व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष) विशाल पोतेकर, मोहोन पोतेकर दादा मोरे, आबा भापकर, (समर्थ नायक साप्ताहिक)सहसंपादक हिंदुराव गायकवाड, शेखर गायकवाड यांच्यासह विविध सामाजिक, पत्रकार, व्यापारी व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी समर्थ प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत, वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजसेवेचीही प्रेरणा असल्याचे सांगितले. वारकऱ्यांची निस्वार्थ सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून अशा उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

समर्थ प्रतिष्ठान, फलटणचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी दिवसभर परिश्रम घेऊन वारकऱ्यांना सेवा पुरवली. शिस्तबद्ध नियोजन, स्वच्छता, सेवा आणि आदरातिथ्यामुळे या उपक्रमाचे वारकरी बांधवांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव...

0
*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव च्या वेताळबाबा मंदिरात महाआरती चे नियोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण पासून...

error: Content is protected !!