Homeताज्या बातम्याशासकीय प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प पेपरची सक्ती बेकायदेशीर – कायदेशीर तज्ज्ञांचे स्पष्ट मत 

शासकीय प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प पेपरची सक्ती बेकायदेशीर – कायदेशीर तज्ज्ञांचे स्पष्ट मत 

फलटण प्रतिनिधी

शासकीय कार्यालयात सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रे व घोषणापत्रांसाठी स्टॅम्प पेपरची सक्ती करू नये, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने दिले असून हे आदेश मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात लागू आहेत. मात्र, प्रत्यक्षात अजूनही अनेक शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांकडून स्टॅम्प पेपर वापरण्याची सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच विविध शासकीय योजना व लाभांसाठी सादर करण्यात येणारी प्रतिज्ञापत्रे ही प्रशासकीय स्वरूपाची कागदपत्रे आहेत. त्यामुळे त्यावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, 1958 अंतर्गत कोणतीही स्टॅम्प ड्युटी आकारण्याचा कायदेशीर आधार नाही. असे असतानाही काही ठिकाणी नागरिकांकडून स्टॅम्प पेपरची मागणी केली जात असल्याने जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.

तज्ज्ञांच्या मते, अशी सक्ती करणे हे शासन परिपत्रक तसेच न्यायालयीन आदेशांचे थेट उल्लंघन असून नागरिकांवर अनावश्यक आर्थिक बोजा टाकणारे आहे. त्यामुळे सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशांची तात्काळ व काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.

दरम्यान, जर कोणत्याही नागरिकांकडून प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प पेपरची सक्ती करण्यात आली, तर त्यांनी संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे तसेच कायदेशीर मार्गाने तक्रार दाखल करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. शासन आदेशांची अंमलबजावणी न झाल्यास नागरिकांच्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

error: Content is protected !!