समर्थ प्रतिष्ठानच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन हजारांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला लाभ
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
फलटण, प्रतिनिधी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त समर्थ प्रतिष्ठान, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये दोन हजारांहून अधिक वारकऱ्यांनी मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचाराचा लाभ घेतला.
या सेवाकार्यात डॉ. संकेत भोगले-देशमुख, डॉ. राजेश निगडे, डॉ. जरग तसेच सातारा येथून आलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी अत्यंत सेवाभावी वृत्तीने सहभाग घेत वारकऱ्यांना निःस्वार्थपणे सेवा दिली. डॉक्टर व विद्यार्थ्यांच्या समर्पित कार्यामुळे हजारो वारकऱ्यांना वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध झाली.
शिबिराचे उद्घाटन फलटण शहरातील मान्यवर ** आमदार सचिन कांबळे पाटील, अमरसिंह नाईक निंबाळकर, डॉ. प्रसाद जोशी, आप्पा नेवसे सुरेंद्रसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक अमोल सस्ते, सातारा जिल्हा भाजपचे जयकुमार शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब कदम, मिलिंद नेवसे, लोकमतचे तालुका प्रतिनिधी व भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विकास शिंदे, पुण्यनगरीचे प्रतिनिधी यशवंत खलाटे, प्रा. शंकर जठार, प्रवीण घनवट, सनी भोईटे, रमण भोईटे** यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी राजेंद्र शेळके, गणेश कोकरे, अजित कोकरे, मंगेश जाधव, ईश्वर सोनवलकर, संजय कोकरे, युवराज चोपडे, बाळू चोपडे, सचिन पोकळे, अजित पोकळे, कैलास सोडमिशे, अमोल सोडमिशे, विठ्ठल बनकर, बबन बनकर, सचिन भुजबळ, राहुल भुजबळ, गणेश ननवरे, संतोष दगडे, प्रतीक दगडे, अशोक जाधव, मधुकर बनकर, राहुल शिंदे, संतोष भोईटे, उदय भोसले, अमोल काकडे, हरी रासने, दिनेश रासने, तेजस पवार, निलेश गायकवाड, रोहित बनकर, शंभू डांगे, सागर पवार,


























