Homeताज्या बातम्या*सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून आमदारांच्या स्वीय सहाय्यकापर्यंतचा प्रेरणादायी व यशस्वी प्रवास; ज्योतीराम घनवट यांना...

*सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून आमदारांच्या स्वीय सहाय्यकापर्यंतचा प्रेरणादायी व यशस्वी प्रवास; ज्योतीराम घनवट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!*

सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून आमदारांच्या स्वीय सहाय्यकापर्यंतचा प्रेरणादायी व यशस्वी प्रवास; ज्योतीराम घनवट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

फलटणच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या कार्याची सुरुवात करून, आपल्या मेहनतीच्या, प्रामाणिकपणाच्या आणि विश्वासार्ह कार्यशैलीच्या जोरावर आमदारांच्या स्वीय सहाय्यक पदापर्यंत मजल मारणारे ज्योतीराम घनवट हे आपल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे आले आहेत.

सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या ज्योतीराम घनवट यांनी मागील १० ते १५ वर्षांपासून आमदार सचिनजी पाटील तसेच फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या सामाजिक कार्याशी जोडले जात समाजातील विविध प्रश्नांवर काम केले. सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना योग्य व्यासपीठापर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये राहिली आहेत.

सन २०२२ पासून भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय होत, पक्षवाढीसाठी त्यांनी विविध गावांमध्ये जाऊन कार्यकर्ते व नागरिकांशी संपर्क साधला. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या काळात पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारून ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. वेळेची पर्वा न करता दिलेले काम पूर्ण करण्याची त्यांची कार्यपद्धती आणि जबाबदारीप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांच्यावरील नेतृत्वाचा विश्वास अधिक दृढ होत गेला.

त्यांच्या कामातील सातत्य, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता लक्षात घेऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सन २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व महायुतीचे नवनिर्वाचित आमदार सचिनदादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ज्योतीराम घनवट यांची नियुक्ती झाली.

स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतरही त्यांनी आपल्या कार्यशैलीत कोणताही बदल न करता नागरिकांच्या सेवेला प्राधान्य दिले. आमदारांकडे येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न समजून घेणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे, संबंधित प्रश्न आमदारांपर्यंत पोहोचवणे आणि त्यावर पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील राहणे, हे काम ते सातत्याने करत आहेत.

विशेषतः नागरिकांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीशी संबंधित कामांमध्ये तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन व आवश्यक समन्वय साधण्याचे कार्य ते जबाबदारीने पार पाडत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आपलेपणाने वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची त्यांची पद्धत ही त्यांच्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करणारी आहे.

“डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर” – कार्यशैलीचा जीवनमंत्र

ज्योतीराम घनवट यांच्या कार्यप्रवासात त्यांच्या स्वभावातील एक विशेष गुण सातत्याने जाणवतो. “काहीही झाले तरी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून वागायचे”, हे जणू त्यांनी स्वतःशीच मनाशी बांधून घेतलेले ब्रीदवाक्य आहे.

परिस्थिती कितीही कठीण असो, समोर कितीही मोठे आव्हान असो; संयम न सोडता परिस्थिती समजून घेणे आणि प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने व गोड शब्दांत संवाद साधणे, ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. संयमाने परिस्थिती हाताळणे आणि गोड बोलून माणसे जोडणे, या तत्त्वाला त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात विशेष महत्त्व दिले आहे.

स्वीय सहाय्यक म्हणून दररोज विविध प्रश्न आणि अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांचे प्रश्न संबंधित ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे, यातून त्यांच्या या कार्यशैलीची प्रचिती येते.

सामान्य कार्यकर्त्यापासून जबाबदारीच्या पदापर्यंतचा हा प्रवास केवळ पदाचा नसून मेहनत, सातत्य, विश्वास, संयम आणि समाजसेवेच्या भावनेचा प्रवास आहे. भविष्यातही ज्योतीराम घनवट यांच्या हातून समाजसेवा आणि जनसेवेचे कार्य अधिक व्यापकपणे घडत राहो, त्यांना उत्तम आरोग्य, यश, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

🎂 ज्योतीराम घनवट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

आपल्या कार्याला नवी दिशा,

आपल्या प्रयत्नांना नवे यश,

आणि आपल्या सेवाभावी प्रवासाला

अशीच जनतेची साथ लाभो!

शुभेच्छुक :– समर्थ २४ तास नेटवर्क,फलटण. समर्थ नायक साप्ताहिक फलटण. समर्थ प्रतिष्ठान फलटण

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश…* *शंभूराज...

0
*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश...* *शंभूराज वर कौतुकाचा वर्षाव* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण मुर्तीजापुर अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय...

*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार*

0
*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सुरवडी : फलटणचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे...

*लहान वयातच वाहतूक नियमांचे संस्कार करा : सचिन विधाते*

0
मुलांना लहानपणापासून वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे सचिन विधाते; धुमाळवाडीत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क ‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीतील...

*सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा...

0
सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा हॉकी संघ; ऐतिहासिक कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क . फलटण क्रीडा...

*तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव* *मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची...

0
तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती; सुरवडीत अभिष्टचिंतन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण सुरवडी, ता....

error: Content is protected !!