सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत महापुरुषांच्या विचारसरणीला जिवंत ठेवत भारतीय संविधानाचा प्रचार, प्रसार व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अहोरात्र झटणारे, धडाडीचे व एकनिष्ठ नेतृत्व म्हणून बहुजन समाज पार्टीचे तालुका नेते प्रेम मोरे यांची ओळख आहे.
वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षापासून सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले प्रेम मोरे गेली १६ वर्षांहून अधिक काळ बहुजन समाज पार्टीत तन–मन–धन अर्पण करून काम करत आहेत. कोणताही पक्षनिधी, फंड किंवा सत्तेचा आधार नसताना, केवळ महापुरुषांच्या विचारांवर विश्वास ठेवून मिशनरी वृत्तीने काम करणारा बहुजन समाज पार्टी हा एकमेव राष्ट्रीय पक्ष असून, या पक्षाचा कार्यकर्ता स्वतःच्या खर्चानेच पक्षाची चळवळ उभी करतो, असे मत प्रेम मोरे व्यक्त करतात.
बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रेम मोरे हे बरड व कोळकी या दोन्ही जिल्हा परिषद गटातून जनतेच्या विश्वासावर आणि मतदारांच्या इच्छेनुसार निवडणूक लढवत आहेत. हत्ती हे निवडणूक चिन्ह व निळा झेंडा घेऊन ते बहुजन समाजाच्या हक्क-अधिकारांसाठी, शासनाच्या योजना जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहेत.
शेतकरी, विद्यार्थी, पीडित, दुर्बल व वंचित घटकांना न्याय मिळवून देणे, गावाचा सर्वांगीण विकास साधणे आणि संविधानिक हक्कांची अंमलबजावणी करणे हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
“एक नोट – एक वोट” या अजेंड्यावर मतदारांनी मदत करावी, बळ द्यावे व ताकद द्यावी, असे आवाहन प्रेम मोरे यांनी केले आहे.
हत्तीला मतदान म्हणजे गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचा विजय, गुलामगिरीच्या विरोधात स्वाभिमानाचा विजय आहे.
“मला हक्काने सेवेची जोरदार संधी द्या,” असे भावनिक आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे.


























