Homeताज्या बातम्याॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी व ॲट्रॉसिटी कायद्याचा तपास कसा करावा - महाराष्ट्र राज्य...

ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी व ॲट्रॉसिटी कायद्याचा तपास कसा करावा – महाराष्ट्र राज्य सचिव वैभवजी गीते (NDMJ)

ठाणे दि.०८| ठाणे या ठिकाणी सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी व ॲट्रॉसिटी कायद्याचा तपास कसा करावा. या विषयावर सखोल नॅशनल दलित मुहमेंट फॉर जस्टीस संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते यांनी ठाणे या ठिकाणी मार्गदर्शन केले. यावेळी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले.

ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या वतीने ॲट्रॉसिटी ॲक्ट च्या प्रमुख तरतुदी व तपासातील त्रुटींची पूर्तता होण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वैभवजी गिते राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी वैभव गीते यांनी मार्गदर्शन करताना उपस्थित सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना गुन्ह्याचा तपास सखोल कसा करावा तसेच परिस्थितीजन्य पुरावे कसे घ्यावेत. गुणवत्तेवर आधारित दोषारोप पत्र कसे तयार करावे. आरोपींना शिक्षा लावण्यासाठी कोणत्या तरतुदींची अंमलबजावणी करावी. याबाबत सखोल मार्गदर्शन केले. वैभव गिते यांनी ठाणे जिल्ह्यातील अनेक खून प्रकरणांचे उदाहरणे देत दोषारोप पत्रातील त्रुटी पुराव्यांसह दाखवून दिल्या. गुन्हा दाखल करताना घ्यावयाची काळजी, फिर्यादी साक्षीदारांच्या अधिकाऱ्यांच्या अंमलबजावणी,प्रतिबंधात्मक उपाययोजना, अर्ज चौकशी करण्याचे नियम इत्यादी बाबींवर प्रकर्षाने चर्चा करण्यात आली.ठाणे जिल्ह्यामध्ये चार खून प्रकरणांमध्ये शासकीय नोकरी देण्यात आल्यामुळे वैभव गिते यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी समाधान इंगळे व निरीक्षक अभिजीत शिंदे यांचे कौतुक केले. आणि राहिलेल्या पीडितांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे अशी मागणी देखील केली.सहाय्यक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करत ॲट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली.ॲड. राहुल गायकवाड यांनी संपूर्ण ॲट्रॉसिटी कायदा त्याचे नियम उपस्थितांना समजावून सांगितले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे महासंचालक सुनील वारे यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.ही कार्यशाळा घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी व समाज कल्याण निरीक्षक अभिजीत शिंदे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी छानपणे पार पाडली.

ठाणे जिल्ह्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट ची सखोल माहिती देणारी सकारात्मक कार्यशाळा झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी व उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच यापुढे अशा कार्यशाळा प्रत्येक तालुक्यांमध्ये घेतल्या जाणार आहेत असेही वैभवजी गिते यांनी सांगितले.

ही संपूर्ण कार्यशाळा जिल्हाधिकारी ठाणे यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी समाधान इंगळे व निरीक्षक अभिजीत शिंदे यांनी पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश…* *शंभूराज...

0
*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश...* *शंभूराज वर कौतुकाचा वर्षाव* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण मुर्तीजापुर अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय...

*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार*

0
*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सुरवडी : फलटणचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे...

*लहान वयातच वाहतूक नियमांचे संस्कार करा : सचिन विधाते*

0
मुलांना लहानपणापासून वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे सचिन विधाते; धुमाळवाडीत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क ‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीतील...

*सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा...

0
सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा हॉकी संघ; ऐतिहासिक कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क . फलटण क्रीडा...

*तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव* *मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची...

0
तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती; सुरवडीत अभिष्टचिंतन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण सुरवडी, ता....

error: Content is protected !!